सामाजिक

दिल्ली येथील जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेत डॉ.हनुमंत सौदागर यांचा सहभाग

नवी दिल्ली/प्रतिनिधी

दि.२५ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’ (TERI) च्या जागतिक शाश्वत विकास शिखर परिषदेच्या (WSDS) रौप्य महोत्सवी वर्षाचे नवी दिल्ली येथील ताज पॅलेस येथे तीन दिवसीय शिखर परिषदेचे उद्घाटन केंद्रीय पर्यावरण,वन आणि हवामान बदल मंत्री श्री.भूपेंद्र यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले ‘परिवर्तन’ हे केवळ ब्रीदवाक्य न राहता ती एक जागतिक चळवळ बनावी जागरूकतेकडून कृतीकडे आता फक्त प्रश्न समजून घेण्याची वेळ राहिलेली नाही,तर प्रत्यक्ष काम करण्याची वेळ आली आहे.असे आवाहन त्यांनी केले.

महाराष्ट्र राज्यातून प्रतिनिधित्व सदस्य म्हणून पर्यावरण अभ्यासक डॉ.हनुमंत सौदागर यांनी या शिखर परिषदेत सहभाग नोंदवला.मुंबई येथून डॉ. रवी एस कुमार हे सहभागी झाले.या शिखर परिषदेसाठी जगभरातून अभ्यासक उपस्थिती होती.यावर्षीची संकल्पना ‘परिवर्तन शाश्वत विकासासाठी दृष्टी,आवाज आणि मूल्ये’ अशी होती.

TERI चे अध्यक्ष नितीन देसाई आणि महासंचालक डॉ.विभा धवन म्हणाले की की, आता केवळ जागरूकतेचा काळ संपला असून प्रत्यक्ष ‘अंमलबजावणी’ आणि ‘कृती’ करण्याची वेळ आली आहे असे मत व्यक्त केले.हिमालय क्षेत्रातील तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार यांना एकत्र जोडण्यासाठी हे ‘इन्नोव्हेशन मेळावा’ प्लॅटफॉर्म लाँच करण्यात आले.आर्चिव्हल पॉकेट बुक शिखर परिषदेच्या गेल्या २५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेणाऱ्या विशेषपुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

परिषदेत हवामान वित्त पुरवठा,स्वच्छ ऊर्जा, प्रदूषण निवारण आणि संसाधन सुरक्षा यासारख्या गंभीर विषयांवर सखोल चर्चा झाली.जागतिक शाश्वत विकास परिषदेस जगभरातून विविध देशाचे प्रतिनिधी भारतातून विविध राज्याचे प्रतिनिधी याबरोबर अभ्यासक, पर्यावरण प्रेमी यांची उपस्थिती होती.या जागतिक स्तरावरील शिखर परिषदेत सहभागी झाल्याबद्दल डॉ.हनुमंत सौदागर यांचे अभिनंदन केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!