बोरफडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत फळवृक्ष लागवड

बीड/प्रतिनिधी
बीड तालुक्यातील मौजे बोरफडी येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत फळवृक्ष लागवड उपक्रम उत्साहात राबविण्यात आला.या उपक्रमाचा उद्देशपर्यावरण संवर्धन,हरित गाव संकल्पना तसेच ग्राम विकासाला चालना देणे हा आहे.या कार्यक्रमाच्या वेळी बोरफडी गावाचे सरपंच श्री.कैलास घुगे यांच्या हस्ते फळवृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी सरपंच कैलास घुगे यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आवाहन केले की,मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत वृक्षसंवर्धन व पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
सरपंच कैलास घुगे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,फळवृक्ष लागवड ही केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर भविष्यातील पिढीसाठीही एक महत्त्वाची गुंतवणूक आहे.गावातील प्रत्येक नागरिकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे.या उपक्रमामुळे गावात हरित क्षेत्र वाढीस लागणार असून पर्यावरण संतुलन राखण्यास मदत होणार आहे.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



