राजकीय

राष्ट्रवादी ओबीसी सेल च्या केज तालुकाध्यक्ष पदी गोविंद ससाणे यांची निवड

केज/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे केज तालुकाध्यक्ष म्हणून सोनिजवळा गावचे सरपंच पती गोविंद ससाणे यांची नुकतीच नियुक्ती झाली. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांचा सत्कार करण्यात आला व शुभेच्छा देण्यात आल्या.

पत्रकारांशी बोलताना गोविंद ससाणे यांनी शासनाने जाहीर केलेल्या यादीत केवळ तीन मंडळांचा समावेश केल्याचे सांगितले.मात्र पूर्ण केज तालुक्यात अतिवृष्टी झालेली असल्यामुळे संपूर्ण तालुका यामध्ये समाविष्ट करावा,अशी मागणी त्यांनी केली. तसेच गावातील सामाजिक सलोखा बिघडलेला असून तो टिकवण्यासाठी काम केले तरच गावाचा विकास साध्य होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.दरम्यान,ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी रमेशराव आडसकर यांच्या मार्फत शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

नदी काढच्या शेतातील विहिरी पूर्ण पणे गाळाने भरल्या असून त्या वीहीरीसाठी अनुदान देण्यात यावे, आर्थिक विकास मंडळाच्या योजना अठरापगड जातींपर्यंत तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गोविंद ससाणे यांनी दिले.तसेच पक्षाने मला राष्ट्रवादी ओबीसीसेलचे नेतृत्व करण्याची संधी दिली त्या बद्दल उप मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे जेष्ठ नेते रमेशराव आडसकर   यांचे देखील त्यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!