प्रशासकीय

नुतन प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुनिलराव केंद्रे यांचा शिक्षकांकडून सत्कार

केज/प्रतिनिधी

केज गट साधन केंद्रचे नुतन प्रभारी गट शिक्षणाधिकारी म्हणून सुनिलराव केंद्रे यांची पुनर्नियुक्ती झाल्याने गट साधन केंद्र,केज येथे शिक्षकांच्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.या प्रसंगी गट साधन केंद्र कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिक्षक गोकुळ सारूक ,सुंदर चौरे, सुनिल नेहरकर, बालासाहेब तांदळे, नामदेव चौरे आदी मान्यवर उपस्थित होते. शिक्षक बांधवांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केंद्रे यांचे स्वागत केले व त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.

सत्कार स्वीकारताना सुनिलराव केंद्रे यांनी उपस्थित शिक्षकांचे आभार मानले.ते म्हणाले कि, शिक्षक हा समाजातील परिवर्तनाचा खरावाहक आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीशिक्षकांनी एकत्रितपणे काम केल्यास केज तालुका निश्चितच शैक्षणिक क्षेत्रात आदर्श ठरेल.

यावेळी शिक्षकांनी तालुक्यातील शैक्षणिक घडामोडी, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास तसेच नवनवीन उपक्रम राबविण्याबाबत चर्चा केली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोकुळ सारूक यांनी केले तर सूत्रसंचालन सुनिल नेहरकर यांनी केले. शेवटी उपस्थित शिक्षकांनी एकमुखाने केंद्रे यांना यशस्वी कार्य काळासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!