वैद्यकीय
धनेगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर संपन्न १४० नागरिकांची केली तपासणी

केज/प्रतिनिधी
स्वस्थ नारी,सशक्त परिवार अभियानांतर्गत आरोग्य वर्धिनी केंद्र, धनेगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.शिबिराचे उद्घाटन गावच्या सरपंच आकांक्षा गुजर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या शिबिरात समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील गोरमाळी यांनी असंसर्गजन्य आजार तपासणी,गरोदरमातांची तपासणी,हिमोग्लोबिन तपासणी तसेच विविध आजारांवर मार्गदर्शन व समुपदेशन केले .
दिवस भरात एकूण 142 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली.शिबिरात एम.पी.डब्लू मनियार कैफ,ज्योती सोनवणे, संध्या मुजमुले, उषा इंगळे,अर्चना मोरे या आशा कार्यकर्त्या यांच्या सह गावातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



