नालंदा विद्यालय केज येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी

केज/प्रतिनिधी
महात्मा ज्योतिबा फुले शिक्षण प्रसारक मंडळ केज संचलित,नालंदा विद्यालय केज,तालुका केज जिल्हा बीड या विद्यालयात दिनांक १२ जानेवारी २०२६ या रोजी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम नालंदा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.मस्के नंदकुमार सर व शाळेतील ज्येष्ठ शिक्षक गरड सर व प्रमुख वक्ते म्हणून वाघमारे एस.बी. सर यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
नालंदा विद्यालयातील मस्के अंकुर,गाडे हर्षद, अलाट विवेक,कु.प्रतिज्ञा मस्के व कु.लोंढे या विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री.वाघमारे एस.बी सर यांनी राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी या थोर व्यक्तींचे विचार आत्मसात करून देशाची समाजाची व आई-वडिलांचे सेवा करावी असे मोलाचेविचार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मांडले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.नंदकुमार मस्के सर यांनी अध्यक्षीय समारोप मध्ये राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्याचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला.
स्वामी विवेकानंद यांचा जन्म दि.१२ जानेवारी १८६३ रोजी कोलकत्ता येथे एका बंगाली कायस्थ परिवारामध्ये झाला. कलकत्ता विद्यापीठातून पदवीधर पाश्चात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय ग्रंथाचा सखोल अभ्यास केला.रामकृष्ण परमहंस यांच्या विचाराने प्रभावित होऊन ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य बनले
अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी सर्वधर्मीय परिषद १८९३ ला भरली होती व या परिषदेमध्ये भारतीय तत्त्वज्ञानाचे प्रतिनिधित्व केले.दि.१ मे १८९७ या रोजी रामकृष्ण मिशन यासंस्थेची स्थापना केली व या संस्थेअंतर्गत समाजसेवा आणि धर्म प्रचारासाठी,प्रसारासाठी कार्य केले.स्वामी विवेकानंदानी वेदांत आणि युगाचे तत्त्वज्ञान जगभर पोहोचवले.दि. ४ जुलै १९०२ रोजी स्वामी विवेकानंद यांनी समाधी घेतली.
राजमाता जिजाऊ यांचा जन्म दि.१२ जानेवारी १५९८रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा याठिकाणी झाला.वडील लखोजीराव जाधव एक पराक्रमी सरदार होते.आईचे नाव म्हाळसाबाई होते.शहाजी राजे भोसले यांच्याशी राजमाता जिजाऊ यांचा लहान वयातच विवाह झाला.जिजाऊंनी शिवबांना रामायण, महाभारत यासारख्या कथा सांगून आणि नैतिक मूल्यांची शिकवण देऊन त्यांच्या मनात स्वराज्याची संकल्पना रुजवली.त्यांनी शिवाजी महाराजांना युद्ध कला,तलवार बाजी, भालाफेक यासारखी कौशल्य शिकवले आणि त्यांना एक उत्तम शासक व योध्दा बनवले.
जिजाऊंनी केवळ शिवाजी महाराज नव्हे तर रयतेलाही प्रेरणा दिली. ज्यामुळे लोक स्वराज्या साठी एकत्र आले.त्या दैववादी नव्हत्या,तर त्यांच्या कृतीत प्रयत्नवाद होता.संकटाच्या काळात ही त्या खचल्या नाहीत असे त्यांच्या कार्यातून दिसून येते.आदर्श स्त्री, आदर्श माता, विचारवंत आणि मार्गदर्शिका यांचा संगम होत्या.ज्यांनी स्त्री शक्तीचे आणि त्यागाचे प्रतीक म्हणून काम केले. जिजाऊंनी दिलेले संस्कार आणि शिकवण यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली,त्यामुळे त्या स्वराज्याच्या जननी म्हणून ओळखल्या जातात.त्यांचे जीवन आजही प्रत्येक स्त्रीसाठी विशेषता मातासाठी एक प्रेरणास्थान आहे असे मानले जाते.त्यांचे निधन दि.१७ जून १६७४ रोजी झाले.
शाळेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व युगपुरुष स्वामी विवेकानंद अशा राष्ट्रमातांचा व युग पुरुषांचा आदर्श घेऊन देशासाठी व समाजासाठी चांगले काम करावे आणि आदर्श नागरिक होण्या साठी महापुरुषांचे आणि राष्ट्रमातांचे विचार अत्यंत मोलाचे काम करतात.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. कांबळे एन.व्ही सर यांनी यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी श्री.गरड.पि.डी,श्री. कदम एस.एस,श्री.बडे ए. टी व श्रीमती गुरमे टी.एम यांनी योगदान दिले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांचे आभार मानले.



