भक्ती,प्रेरणा आणि समाज प्रबोधनाचा अविस्मरणीय सोहळा – आमदार मंगेश चव्हाण

केज/प्रतिनिधी
नांदेड येथे एकदंत गणेश महोत्सवानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात वारकरी संप्रदाय भूषण,प्रेममूर्ती, गुरुदास ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाने भाविकांचे मन,बुद्धी आणि आत्मा भारावून गेला.उपस्थित प्रत्येक श्रोत्याच्या अंत:करणा ला भक्तिभावाची ओल आणिसमाजप्रबोधनाची नवी दिशा लाभली.

या सोहळ्यास आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी आवर्जुन उपस्थित राहून भक्तिगंगा अनुभवली.संतपरंपरेचा दिव्य संगम ह.भ.प. समाधान महाराजांनी आपल्या प्रभावी शैलीत शिवमहापुराण,रामकथा तसेच संत परंपरेतील विचार यांचा अद्भुत संगम घडवला.त्यांच्या कीर्तनात केवळ धार्मिक गोष्टींचा वेध नव्हता,तर सामाजिक जाणीवेची ठिणगी पेटवणारे संदेश होते. युवकांना प्रगतीची प्रेरणा,शेतकऱ्यांच्या अडचणींवर उपाय योजना,कुटुंबातील नातेसंबंधातील संस्कार, आणि एकूणच समाजाला बांधून ठेवणारे विचार असा सर्वसमावेशक दृष्टिकोन त्यांच्या वाणीमधून प्रकट झाला.समाजाशी घट्ट नाळ जोडणारे विचार कीर्तनऐकणाऱ्या श्रोत्यांना असे वाटत होते की,महाराजांनी त्यांच्या जीवनातील प्रश्न ओळखले आणि त्यांना योग्य दिशा दिली.त्यांचे कथन हे फक्त धर्म प्रबोधना पुरते मर्यादित नसून जीवनातील अंधार दूर करणारी एक प्रदीर्घ दीपज्योत होती. समाजाशी जोडलेली ही संतपरंपरेची वाणी आजच्या काळात फारच महत्त्वाची आहे, अशी भावना अनेक श्रोत्यांनी व्यक्त केली.
आमदार मंगेश चव्हाण यांची प्रतिक्रिया ह.भ.प.समाधान महाराजांचे कीर्तन म्हणजे संत परंपरेची अखंड गंगा आहे. परवाचा दिवस हा माझ्यासाठी भक्तिभाव, नैतिकता आणि समाज सेवेची दिशा देणारा ठरला.त्यांच्या विचारांनी मन भारावून गेले. ह.भ.प.समाधान महाराजांना शतशः प्रणाम करतो,अशा शब्दांत आमदार मंगेश रमेश चव्हाण यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
सोहळ्याचा समारोप भक्तिगजरात अखेर संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारून गेले. “गणपती बाप्पा मोरया! जय हरिः विठ्ठल!जय महाराष्ट्र!”या घोषणांनी सोहळ्याचा समारोप झाला.भाविकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते आणि अंत:करणात समाजसेवेचा संकल्प अशी प्रतिक्रिया श्रोते मंडळींनी व्यक्त केली आहे.



