सामाजिक

ओबीसी योद्धा प्रा.लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत आज केज तालुक्यातील ओबीसी बांधवांच्या बैठकीचे आयोजन.

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील ओबीसी बांधवांची बैठक व पत्रकार परिषद ओबीसी योद्धा प्रा.श्री लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत दिनांक 07 सप्टेंबर 2025 रविवार रोजी दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह केज तालुका केज जिल्हा बीड येथे आयोजन केले आहे.

प्रा.लक्ष्मण हाके ओबीसीच्या न्याय हक्क आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सतत प्रयत्नशील आहेत. मराठा आरक्षणाच्या संदर्भात काढलेल्या नवीन शासन आदेशां मुळे ओबीसी आरक्षणा वर परिणाम होईल अशी भीती व्यक्त होत आहे,त्यामुळे ओबीसी घटकांनी याविरोधात आंदोलने आणि कायदेशीर लढा देण्याची गरज आहे. यासाठी प्रा.लक्ष्मण हाके यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे.

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला जीआर हा ओबीसी आरक्षण संपविणारा ‘काळा कागद’ आहे.मराठा आरक्षणाच्या नावाखाली बोगस प्रमाणपत्रे काढून ओबीसींचे हक्क हिसकावले जात आहेत.वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॕड.प्रकाश आंबेडकर म्हणाले की,ओबीसींचे आरक्षण ओबीसींनाच राहिले पाहिजे.हे भांडण लावणारे शासन आहे. जबरदस्तीने दिलेले आरक्षण आहे.त्यासाठी मोठी लढाई लढावी लागेल.रस्त्यावर उतरावे लागेल.

’आरक्षणाचे संरक्षण करण्यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्र येणे गरजेचे आहे यासाठी संबंध महाराष्ट्रात प्रा.लक्ष्मण हाके बैठका घेत आहेत. अशाच बैठकीचे आयोजन शासकीय विश्रामगृह केज येथे केले आहे तरी सर्व ओबीसी बांधवांनी दिलेल्या वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!