प्रशासकीय

मांजरा धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले .धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग,मांजरा नदीकाठ च्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी प्रशासनाचा इशारा 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील मांजरा प्रकल्प धनेगाव धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या संततधार पावसामुळे आणि धरणातील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10-15 वाजता गेट क्रमांक 1 ते 6 प्रत्येकी 0.50 मीटरने उघडण्यात आले आहेत.

सध्या धरणातून एकूण 10,482.84 क्युसेक्स (296.88 क्युमेक्स) इतका विसर्ग सुरू आहे.धरणामध्ये होणारी पाण्याची आवक पाहून विसर्गात वाढ अथवा कपात करण्याचानिर्णय घेण्यात येईल,असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे मांजरा नदीपात्रातील पाणीपातळी वाढणार असून नदीकाठावरील तसेच पुरग्रस्त होऊ शकणाऱ्या गावांतील नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी,असा इशारा मांजरा प्रकल्प धनेगाव पुर नियंत्रण कक्ष यांच्याकडून देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!