सामाजिक

मुंबई मराठा आरक्षण आंदोलनात पहिला बळी,वरपगावचे सुपुत्र सतीश ज्ञानोबा देशमुख यांचे हृदयविकाराने निधन 

केज/प्रतिनिधी

दि.29ऑगस्टच्या मुंबई मराठा आरक्षणाचा पहिला बळी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील वरपगाव चे सुपुत्र सतीश ज्ञानोबा देशमुख यांच्या रूपाने गेला आहे.’मराठा समाजाला आरक्षण मिळावे’ यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत दि.29 ऑगस्ट मुंबईत होणाऱ्या आमरण ऊपोषणासाठी गेलेल्या लाखो मराठा समाज बांधवासोबत सतीश देशमुख सहभागी झाले होते.

बुधवारी सकाळी ते गावातील कांहीं सहकाऱ्यांसोबत मुंबई च्या दिशेने निघालेल्या रॅलीत सहभागी झाले होते.बुधवारी रात्री जुन्नर येथे मुक्काम झाल्या नंतर गुरुवारी सकाळी 10 वाजता ते आपल्या सहकाऱ्यासोबत आंघोळ,नाष्टा आटोपून रॅलीत नारायणगाव मार्गे मुंबईच्या दिशेने निघाले होते.गाडीत बसून दहा मिनिटे प्रवास करताच त्यांचा वाटेत हृदय विकाराच्या धक्याने त्यांचा मृत्यू झाला.

सतीश देशमुख अत्यंत शांत,जिद्दी व प्रामाणिक स्वभावाचे होते.सतीश देशमुख यांच्या परिवारा ला देशसेवेचा वारसा लाभलेला आहे.त्यांचे वडील ज्ञानोबा एकनाथराव देशमुख व लहान भाऊ व्यंकटेश ज्ञानोबा देशमुख हे भारतीय सैन्यदलात सेवारत होते.सध्याच्या मुंबई आंदोलनात भाऊ व्यंकटेश ज्ञानोबा देशमुख यांनी पुणे व बीडजिल्ह्यात गावोगावी फिरून मराठा बांधवां मध्ये आरक्षणाचे महत्व पटवून मोठी जनजागृती केली होती. यावेळी आपल्या मोठ्या भावाचे प्राण गमवावा लागतील याची कल्पनाही केली नसेल.या कुटुंबावर दोन वर्षात हा दुसरादुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन वर्षापूर्वीच सतीश देशमुख यांच्या स्वप्नील नावाच्या मोठ्या मुलाचा विजेचा करंट लागून मृत्यू झाला होता.

बेरोजगार असणारा स्वप्नील इतरांच्या ट्रॅक्टर वर काम करून कुटुंबाचा आधार बनू पाहत होता.ट्रॅक्टर वर काम करत असतानाच त्याचा मृत्यू झाला. सध्या सतीश देशमुख आपला दुसरा मुलगा शिवप्रसाद याला बारावी नंतरच्या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्याच्या विवंचनेत होते.कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असल्याने व पॉलिटेक्निक च्या प्रवेशाचे मोठे शुल्क आवाक्याबाहेर असल्याने शिवप्रसाद च्या पॉलिटेक्निक प्रवेशासाठी ते चिंतीत होते.

मराठा आरक्षणा मुळे तरी आपल्या मुलाला शिक्षणात सूट मिळेल या आशेने ते या मुंबई मराठा आरक्षणात सहभागी झाले होते. हे दुःखद वृत्त कळताच संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मृत सतीश देशमुख यांचे लहान बंधू मराठा सेवक व्यंकटेश देशमुख यांना जवळ बोलावून त्यांचे सांत्वन केले व देशमुख कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले.

सतीश देशमुख यांच्या मागे आई,पत्नी संध्या,मुलगा शिवशंकर व लहान बंधू व्यंकटेश यांचा परिवार आहे.मयत सतीश देशमुख हे अंबेजोगाई येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड.माधव जाधव यांचे मेव्हणे आहेत.सतीश देशमुख यांच्यावर शुक्रवार दि.29 ऑगस्ट   रोजी सकाळी ठीक 8 वाजता त्यांच्या मूळ गावी वरपगाव ता.केज येथे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.त्यांच्या परिवाराच्या दुःखात सकल समाज सहभागी आहे.त्यांना सकल मराठा बहुजन समाजा च्या वतीने भावपूर्ण आदरांजली समर्पित होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!