पांगरी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी विजयकुमार खुळे व्हाईस चेअरमन सचिन थोरात यांची निवड

धारूर/प्रतिनिधी
धारूर तालुक्यात बहुचर्चित असणारी पांगरी आवरगाव, कोळपिंपरी ग्रुप सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक महिना भरा पूर्वी संपन्न झाली होती. 26 ऑगस्ट मंगळवार रोजी या सोसायटीतून निवडून आलेल्या संचालकांनी बिनविरोध पद्धतीने सोसायटीच्या चेअरमनपदी कोळ पिंपरीचे माजी सरपंच विजयकुमार खुळे यांची तर व्हाईस चेअरमन पदी सचिन थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली. चेअरमन,व्हाईस चेअरमन निवडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेशराव आडसकर, ऋषिकेश आडसकर यांनी पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
धारूर तालुक्यात मागील चार महिन्या पासून पांगरी,आवरगाव कोळपिंपरी या ग्रुप सेवासहकारी सोसायटी चा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून कार्यक्रम स्थगिती नंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया यातून परस्पर असणाऱ्या दोन तगड्या पॅनल मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रमेश आडसकर यांच्या बळीराजा शेतकरी विकास पॅनलचे सर्व तेरा संचालक मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.
या निवडून आलेल्या संचालका पैकी दि.26 ऑगस्ट रोजी कोळपिंपरीचे माजी सरपंच विजयकुमार खुळे यांची चेअरमन पदी तर व्हॉईस चेअरमन पदी पांगरी येथील सचिन थोरात यांची बिनविरोध निवड प्रक्रिया सर्व संचालकांच्या सर्वांनुमते करण्यात आली. चेअरमन व्हाईस, चेअरमन निवडी नंतर उपस्थित त्यांना संबोधीत करतअसताना चेअरमन विजयकुमार खुळे यांनी लोकांच्या विश्वासाला कोणताही तडा जाऊ देणार नसल्याचे सांगत सभासद मतदार या सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.



