
केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित, स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विभाग केज या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातही नेहमीच प्रगतीचा अहवाल उंचावलेला आहे.या यशात आणखी एक मानाचा तुरा म्हणजे शाळेतील पाच खेळाडूं ची राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.तसेच अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा जिल्हा स्तरीय स्पर्धेत व गट शिक्षणाधिकारी कार्यालय केज मार्फत घेण्यात आलेल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेतही शाळेतील विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश संपादन केले.तेंव्हा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच स्वामी विवेकानंद विद्यामंदिर स्वयं-अर्थ सहाय्यित शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नारायण अण्णा अंधारे यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.याप्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे सचिव जी.बी. गदळे,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे शाळेच्यामुख्याध्यापिका शिवनंदा मुळे व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
केज येथील स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विभाग या शाळेचे आजपर्यंत राष्ट्रीय पातळीवर एकूण ६ खेळाडू सहभागी झाले त्यापैकी २ वेळेस राष्ट्रीय पातळीवरील ब्राँझ मेडल तर राज्य स्तरीय स्पर्धेत एकूण ८८ खेळाडूंचा सहभाग त्यापैकी २ वेळेस ब्राँझ मेडल मिळाले.तसेच दि.२३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई याठिकाणी पार पडलेल्या बीड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी मैदानी स्पर्धेत या शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यामध्ये ट्रेथलोन या स्पर्धेत १४ वर्ष वयोगटातून- कराड प्रगती महादेव बीड जिल्ह्यातून सर्वप्रथम, पाटील दिपाली भीमाशंकर जिल्ह्यातून सर्वप्रथम,कुलकर्णी शार्दुल व थोरात हरीश हे जिल्ह्यातून सर्व द्वितीय आले.१६ वर्ष वयोगटातून- घुले ऐश्वर्या बप्पाजी या खेळाडूने गोळा फेक,भालाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये जिल्ह्यातून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला आहे. वरील प्रथम व द्वितीय आलेले सर्व खेळाडू दि. २ ते ५ सप्टेंबर २०२५ या कालावधीत बालेवाडी पुणे या ठिकाणी होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेत बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
वरील यशस्वी खेळाडूंना शाळेतील क्रीडा शिक्षक श्रीकिशन नेहरकर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच द्वारकादास मंत्री राजस्थानी विद्यालय बीड या ठिकाणी पार पडलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी मेळावा २०२५ जिल्हा स्तरीय स्पर्धेतशाळेतील चाटे आरती बिभीषण हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. या विद्यार्थिनीस शाळेतील सहशिक्षक धनराज मैंद यांचे मार्गदर्शन लाभले.
शैक्षणिक धोरण २०२० च्या पाच वर्षपूर्ती निमित्त गट शिक्षणाधिकारी कार्यालय केज मार्फत घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत बारगजे स्वराली विक्रम हिचा तृतीय तर रांगोळी स्पर्धेत बियाणी तनुजा संतोषकुमार या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आला.वरील यशस्वी विद्यार्थिनीस शाळेतील चित्रकला शिक्षक दादासाहेब गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. त्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व मार्गदर्शक शिक्षकांचाही प्रसंगी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले.तर आभार दत्ता सत्वधर यांनी मानले.



