राजकीय

एकजुटीमुळेच काँग्रेस पक्ष मजबुत -खा.रजनीताई पाटील

केज/प्रतिनिधी

शिमला येथील पीटरहॉफ येथे शुक्रवार रोजी मतचोरी विरोधात रॅली काढण्यात आली. हिमाचल प्रदेश काँग्रेस च्या प्रभारी राज्यसभा खा.रजनीताई पाटील यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना काँग्रेस पक्ष हा कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळेच आजही सक्षम व मजबूत आहे. कार्यकर्त्यांच्या सक्रियते मुळेच संघटनाला नव संजीवनी मिळते,असे प्रतिपादन काँग्रेसच्या हिमाचल प्रदेश प्रभारी व राज्यसभा खा. रजनीताई पाटील यांनी केले.यावेळी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू, प्रदेश काँग्रेस अध्यक्षा प्रतिभा सिंह,हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रभारी खा.रजनीताई पाटील आदी उपस्थित होते.

यानंतर,खा.रजनीताई अशोकराव पाटील व मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसोबत काँग्रेस आमदार दलाच्या बैठकीत सहभाग घेतला.याबैठकीत येत्या काळात पक्षाच्या वतीने आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा झाली तसेच संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ठोस रणनीती आखण्यात आली.

आम्ही पूर्ण समर्पण आणि एकजुटी ने काँग्रेस पक्षाची मजबुती,तसेच राज्याची सेवा आणि विकासासाठी सातत्याने कार्य करत राहू मत व्यक्त केले.त्या पुढे त्या म्हणाल्या की, कार्यकर्त्यां मधील परस्पर सहयोग आणि निष्ठा हेच पक्षाच्या बळाचे प्रमुख स्तंभ आहेत.स्थानिक पातळी पासून ते राष्ट्रीय स्तरा पर्यंत काँग्रेस पक्षाने नेहमीच लोकांच्या हितासाठी काम केले आहे.सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि शेतकरी श्रमिकांचे प्रश्न सोडविण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे असे मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!