कृषी

विजेचा धक्का लागून शेतकरी ठार

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील कोरडेवाडी शिवारातील घाटेवस्ती येथे राहणारे शेतकरी बाबासाहेब रावसाहेब राख,वय 55 वर्षे यांना सोमवारी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान विजेचा धक्का बसला.जखमी अवस्थेत त्यांना केज येथील उप जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता डॉक्टरांनी त्यांची तपासणी करुन त्यांना मयत घोषित केले.

सोमवारी दि.18 आॕगष्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान कोरडेवाडी शिवारातील घाटेवस्ती येथे राहणाऱ्या बाबासाहेब रावसाहेब राख,वय 55 वर्षे यांना सोमवारी दि.18 आॕगष्ट रोजी राहत्या घरी विजेचा धक्का लागून ते जखमी झालेहोते.त्यांना पुढील उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात घेवून गेल्या नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची  तपासणी करुन त्यांना मयत झाल्याचे घोषित केले.बाबासाहेब राख यांच्या पश्च्यात पत्नी, 1 मुलगा असा परिवार असून सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर कोरडेवाडी येथील स्म्शानभूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!