इस्थळ आरोग्य उपकेंद्राची 1 लाख 16 हजाराची रक्कम अधिकार नसताना उचलली,वैद्यकीय अधिकारी,आरोग्य सेविकेसह, शाखाधिकाऱ्या विरुद्ध गुन्हा नोंद

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील इस्थळ येथील आरोग्य उपकेंद्राच्या बळकटी करणासाठी मंजूर झालेला 1 लाख 16 हजाराचा निधी अधिकार नसताना उचलल्या प्रकरणी बनसारोळा येथील वैद्यकीयअधिकारी येजाजूद्दीन मोमीन,इस्थळ उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनीषा पानसरे व आय डी बी आय बँकेचे शाखाधिकारी या तिघां विरुद्ध तालुका आरोग्य अधिकारी डॉ अशोक गवळी यांच्या फिर्यादी वरून युसूफ वडगाव पोलिसात बुधवारी मध्यरात्री गुन्हा नोंद झाला आहे.
सन 2024 यावर्षात शासनाकडुन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र इस्थळ च्या बळकटीकरणासाठी 1लाख 16 हजार 694 रुपये एवढी रक्कम त्यांच्या बँकेच्या खात्यावर जमा झाली होती.ही रक्कम दि.13/06/ 2024 रोजी आरोग्य सेविका मनिषा पानसरे यांनी आयडीबीआय बँकेच्या बनसारोळा शाखेतून काढल्याचे निदर्शनास आले असता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांनी बीड येथील जिल्हा आरोग्य अधिकारी यांना यासंबंधीचा लेखी अहवाल सादर केला.
त्यांच्या आदेशावरून या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता उपकेंद्राच्या खात्यातुन इस्थळ येथील सरपंच व तात्कालीन आरोग्य सेविका श्रीमती रेड्डी यांच्या सहीने रक्कम काढता येत होती.परंतु आरोग्य सेविका श्रीमती रेड्डी यांची बदली झाल्या नंतर आरोग्य सेविका मनीषा पानसरे यांना बँकेच्या खात्यातून रक्कम काढण्याचे कोणतेही अधिकार नसताना त्यांनी दि.13/6/2024 रोजी इस्थळ येथील उपकेंद्राच्या खात्यातुन उपकेंद्राचे बळकटीकरणा साठी मिळालेल्या निधीची रक्कम 1लाख 16 हजार 694 रुपये एवढी रक्कम परस्पर काढल्याचे बॅक स्टेटमेंटवरुन आढळून आले.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक गवळी यांनी केलेल्या चौकशीत आरोग्य सेविका मनिषा पानसरे यांना उप केंद्र इस्थळचे बँक खात्या तुन रक्कम काढण्याचा कोणताही अधिकार नसतानाही त्यांनी शाखा अधिकारी,आयडीबीआय बँक शाखा बनसारोळा यांच्याशी संगनमत करुन सदरची रक्कम काढुन सदर शासकीय निधीच्या रकमेचा अपहार करुन शासनाची 1 लाख 16 हजार 694 रुपयाची फसवणुक केल्या चे आढळून आल्यामुळे
बनसारोळा आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री. डॉ.एजाजुद्दीन कमरुद्दीन मोमीन यांचे सांगणेवरुन सदरची रक्कम आरोग्य सेविका श्रीमती मनिषा पानसरे यांनी बॅकेतुन काढल्याचे निष्पण झाल्यामुळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक शिवाजी गवळी यांच्या फिर्यादी वरून बनसारोळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैदकीय अधिकारी डॉ.एजाजोद्दीन कमरुद्दीन मोमीन,इस्थळ उपकेंद्राच्या आरोग्य सेविका मनिषा पानसरे, व बनसारोळा येथील आयडीबीआय बँकेचे शाखाअधिकारी ( अज्ञात )यांच्या विरुध्द युसूफवडगाव पोलिसात बुधवारी (दि.29 ) मध्य रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान गुन्हा नोंद झाला आहे.



