चंदनसावरगाव शिवारात विद्युतमोटार, केबलच्या चोरांचा धुमाकूळ,युसुफवडगाव पोलिसांसमोर आव्हान

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चंदन सावरगाव शिवारातील विद्युत मोटारींच्या केबल वायर ची चोरी होत असल्याने युसुफ वडगाव पोलीसां समोर चोरट्यांनी तपास करण्यासाठी आव्हान उभे केले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की,शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करित असताना शेतातील विद्युत पंप, वायर चोरीच्या घटना वाढल्याने चिंतेत भर पडली आहे.केज तालुक्यातील चंदन सावरगाव शिवारातून शेतकऱ्यांच्या लाखोंच्या केबल वायरची चोरी गेल्या असून चोरटे शेत शिवारांमध्ये मोठ्या चोऱ्या करीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

केज तालुक्यातील चंदनसावरगाव रस्त्या लगत परिसरात शेतकऱ्यांचे विद्युत मोटार,स्टार्टर,पाईप, वायर चोरणारी मोठी टोळी सक्रिय झाली असुन शेतकऱ्यांचे शेतातील साहित्य चोरीचे प्रमाण वाढले असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.अंदाजे सात ते आठ शेतकऱ्यांच्या शेतातून चोरट्यानी मागील महिन्यात मध्यरात्री शंकरशिवाजी तपसे यांच्या शेतातील सर्व सोलर प्लेटची चोरी केली.तसेच दि.८ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी पुरुषोत्तम तपसे यांच्या शेतातील दोन पाणबुडी मोटर व वायर,व्यंकटी तपसे यांच्या विहिरीतील मोटार,वायर,तसेच गणेश उकंडे यांच्या शेतातील पाणबुडी मोटार व वायर तर अशोक श्रीराम तपसे यांच्या शेतातील पाणबुडी मोटर, बाळासाहेब तपसे यांचे वायर असे चोरी झालेले आहे.दरम्यान युसुफ वडगाव पोलीसांनी याचा तपास करुन चोरी च्या घटनांना पायबंद घातला पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

