गुन्हेगारी

74 लाखाचा गुटखा घेऊन जाणारा मालट्रक केज पोलिसांनी पकडला, 1 कोटींचा मुद्देमाल जप्त

केज/प्रतिनिधी

मध्यप्रदेशातून 74 लाख 52 हजाराचा गुटखा घेऊन आलेला मालट्रक गुरुवारी दि. 7 आॕगष्ट रोजी रात्री धाराशिव जिल्ह्यातील कळंब कडे जाताना केज पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडला.या प्रकरणी दोघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दि.7 ऑगस्ट रोजी मध्यप्रदेशातून केज मार्गे कळंब जि. धाराशिव कडे गुटखा घेऊन एक ट्रक केजच्या दिशेने येत असल्याची माहिती केज पोलिसांना मिळाली.माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांनी त्यांच्या पथकाला ट्रक क्र.डी डी-02/एस-9442 ताब्यात घेण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले.पोलिसांनी तो ट्रक ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला.सदर ट्रक छत्रपती शिवाजी महाराज चौकातून भरधाव वेगात कळंब च्या दिशेने वळविण्यात आला.पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने पाठलाग करून केज कळंब महामार्गांवर दीड कि.मी.भरधाव वेगात जाणाऱ्या मालट्रकला पोलिसांनी ओव्हरटेक करून कळंब रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपा जवळ पोलिस गाडी आडवी लावून गुरुवारी दि.7 दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी इशारा करून मालट्रक थांबवला.थांबताच ट्रक चालकाशेजारी बसलेला मोहन गायकवाड याने ट्रकमधून उडी मारून जवळच्या शेतात पळून गेला.त्यांच्या मागे काट्या -कुट्यातूनआणि शेतातील चिखल तुडवीत पोलिसांनी त्याचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन उसाच्या शेतात लपून बसलेल्या परशुराम गायकवाड याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने जालीमसिंग रा. बुऱ्हाणपूर,ता.जि. बुरहानपूर,मध्यप्रदेश चा राहणारा असल्याचे सांगितले.मालट्रक मधील 74 लाख रुपये 52 हजार रुपयाचा गुटखा इंदौर येथुन मालट्रक मध्ये भरून हा गुटखा धाराशिव जिल्ह्यातील कळंब येथील व्यापारी रूपेश मालपाणी रा.कळंब यांना पोहोंच करायचा होता.अशी माहिती दिली.केज पोलिसांनी रईसोयीन अमीरोद्दीन शेख, वय 59 वर्षे, रा. मील्लतनगर,ओकाला रोड,ता.जि.रतलाम, मध्यप्रदेश व परशुराम मोहन गायकवाड वय 22 वर्षे,रा.एकनाथ वाडी ता.पाथर्डी जि. अहिल्यानगर ह.मु. बीड या दोघांना ताब्यात घेऊन मालट्रक जप्त करुन पोलिस ठाण्यात लावण्यात आला.या मालट्रकची पंचा समक्ष झडती घेतली असता या मालट्रक मधील 74 लाख 52 हजार रुपयांच्या गुटख्यासह मालट्रक मिळून 1 कोटी 1 लाख 54 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई..!

सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे,पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम,जमादार शिवाजी कागदे,त्रिंबक सोपने,हनुमान मुंडे, शमीम पाशा,वाहन चालक सहाय्यक उपनिरीक्षक शंभुदेव दराडे यांनी पाठलाग करून केज कळंब महामार्गांवर भरधाव वेगात जाणाऱ्या मालट्रकला दिड कि.मी अंतरावर पोलिसांनी ओव्हरटेक करून कळंबरोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपा जवळ पोलिस गाडी आडवी लावून पोलिसांनी ताब्यात घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!