राजकीय

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पक्षात वंचित बहुजन आघाडी च्या असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

केज/प्रतिनिधी

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या पार्टीमध्ये दि.०४ऑगस्ट रोजी वंचित बहुजन आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांचा केज येथे जाहीर प्रवेश झाला असून यामुळे आर पी आय च्या आठवले पक्षाची ताकद वाढली आहे.केंद्रीयमंत्री ना. रामदासजी आठवले यांच्यावर विश्वास ठेऊन संदीपान तात्या हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली व केज तालुका अध्यक्ष सुनिलजी हिरवे यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेशजी बचूटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) मराठा आघाडीचे महादेव ढवारे,तालुका उपाध्यक्ष व्यंकट हजारे,देवानंद वाघमारे,मिलिंद गायकवाड,अमोल मस्के वंचितचे सुनील जोगदंड,शहाजी जोगदंड,प्रकाश जोगदंड,जयसिंग जोगदंड,विष्णू जोगदंड, राहुल जोगदंड,उत्तम वाघमारे विकास गायकवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशा नुसार व संदीपान तात्या हजारे व केज तालुका अध्यक्ष सुनीलजी हिरवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा जाहीर प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!