शैक्षणिक

बनसारोळा येथील आदर्श विद्यालयात विद्यार्थी संसद निवडणूक उत्साहात संपन्न 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,बनसारोळा येथे दिनांक 4 ऑगस्ट 2025 रोजी विद्यार्थी संसदनिवडणूक मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करण्या साठी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध खात्यांसाठी मंत्री निवड करण्यात आले.

यानिवडणुकीत विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक महादेव पौळ वर्ग 12 वी विज्ञान आणि संकेत मनोज पांचाळ वर्ग दहावी अ,आरोग्य मंत्री राधिका किरण बोरगे वर्ग नववी ब,अक्षरा गुणवंत गायकवाड वर्ग नववी अ,स्वच्छता मंत्री काकडे तेजस्विनी शुकलेश्वर काकडे वर्ग आठवी ब,क्रीडा मंत्री आर्यन विठ्ठल काकडे वर्ग आठवी ब,संगमेश्वर मारुती शिंदे वर्ग नववी ब,शालेय शिस्त मंत्री हर्षवर्धन श्रीपाद गोरे वर्ग सातवी अ अधिराज ज्ञानेश्वर रोकडे वर्ग सातवी अ,वृक्षारोपण मंत्री गणेश सतीश पौळ वर्ग बारावी कला,प्रतीक महादेव पौळ वर्ग‌ बारावी विज्ञान, सांस्कृतिक मंत्री श्रद्धा अनिल जोगदंड वर्ग आठवी अ,राधा गणेश करंजकर वर्ग बारावी विज्ञान आणि विद्या मंत्री अक्षरा अमोल गोरे वर्ग दहावी अ,संकेत मनोज पांचाळ वर्ग दहावी अ अशी विविध पदे विद्यार्थ्यांमध्ये वाटप करण्यात आली.सर्व पदाधिकारी विद्यार्थ्यांची निवड निवडणूक प्रक्रियेद्वारे करण्यात आली.या उपक्रमात मुख्याध्यापक सौ. सिंधुताई चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.सांस्कृतिक विभागप्रमुख श्री.संतोष रोकडे व श्री.शिवाजी मांदळे यांनी नियोजनाची जबाबदारी पार पाडली.हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण,जबाबदारीची जाणीव आणि लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!