शैक्षणिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिकशाळा तरनळी शाळेत क्रांतिसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी 

केज/प्रतिनिधी

दि.3 ऑगस्ट 2025 रविवार रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संपत्ती सुदाम सरवदे,उपाध्यक्षा सीमा सुधीर मोहिते,जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त पुष्पहार अर्पण करूनअभिवादन केले.क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहे या गावी आजोळी दि.3 ऑगस्ट 1900 रोजी झाला.त्यांचे मुळ गाव येडे मच्छिंद्र आहे. वडिलांचे नाव रामचंद्र पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई होते.ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.

त्यांनी अंधश्रद्धा,हुंडा पद्धत या अनिष्ट प्रथा,चालीरीती बाबत जनजागृती केली ब्रिटिशांच्या अन्यायी राजवटीस आव्हान देऊन क्रांतिकारक मार्गाचा पुरस्कार केला. जबरीने सारा वसूल करणारास पायावर काठीने मारत व पत्रेही ठोकण्यात येत.त्यांची ग्रामराज्य स्थापन करण्याची कल्पना होती.ते कॉंग्रेस पक्ष सोडून कम्युनिस्ट पक्षात जाऊन दोन वेळा लोकसभेवर निवडून आले व खासदार झाले. ते बीड लोकसभा मतदार संघात 1967 मध्ये निवडुन आले. त्यांना प्रती सरकार किंवा पत्री सरकार म्हणुन ओळखले जात असत.असे आपल्या प्रास्ताविकात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तरनळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांनी सांगितले. श्री.बाळासाहेब भिल्लु राठोड सर यांनी सविस्तर माहिती दिली. श्रीमती गिताताई जीवराज अंडील मॅडम, श्रीमती सोनाली भारतराव भुमकर मॅडम,ट्रेनी शिक्षिका सीमा सुधीर मोहिते मॅडम,शिक्षक श्री.भारत बाबुराव हांगे सर,श्री. बाबासाहेब राजाराम मैंद सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचालन इयत्ता 7 वी ची श्वेता सुहास सरवदे यांनी केले.आभार भाग्यश्री ओमप्रकाश मोहिते यांनी मानले व कार्यक्रम संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!