शैक्षणिक

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ शाळेला सरस्वती महाविद्यालय केजच्या माजी प्राचार्य रोहिणी गजेंद्रगडकर यांची सदिच्छा भेट               

केज/प्रतिनिधी

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची ता.केज या शाळेला सरस्वती महा विद्यालय केजच्या माजी प्राचार्या श्रीमती रोहिणी गजेंद्रगडकर-काळे मॅडम यांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांशी शैक्षणिक हितगुज केले व विद्यार्थ्यांना शिक्षण विषयी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या सोबत आलेले त्यांचे यजमान श्री.शामराव भाऊराव काळे साहेब केज चे सेवानिवृत्त सबपोष्टमास्तर यांनीही विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले.या दोघांनी या शाळेतील सर्वशिक्षक,शिक्षिका वृंदांना मार्गदर्शन करुन पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या.या शाळे तील लोकनेते मा.आ.कै. बाबुरावजी आडसकर साहेब यांच्या स्मरणार्थ “आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५” प्राप्त शिक्षक श्री. आबासाहेब तुळशीराम धपाटे सर यांचा सत्कार केला.

श्रीमती गजेंद्रगडकर मॅडम या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुंबेफळ केंद्र केज मुलांची या शाळेचे अपग्रेड मुख्याध्यापक श्री. राजाभाऊ दत्तात्रय कदम यांच्या शिक्षिका होत्या.या दांपत्याचे शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करुन सन्मानित करण्यात आले.त्यांनी कुंबेफळ येथील श्री सिद्धि विनायक गणपतीचे दर्शन दर्शन घेतले.शेवटी श्री. आबासाहेब तुळशिराम धपाटे सरांनी आभार मानले.या शाळेतील प्राथमिक पदवीधरशिक्षक डॉ.श्री.रामकिशन मुळे सर,आकाश लोंढे सर, राहुल बजरंग बचुटे सर, प्राथमिक पदवीधरशिक्षक श्री.संदीप मेघराज ठोंबरे सर,श्रीमती भोरे निलावती आनंदराव मॅडम,श्रीमती उटीकर अंजली गोविंदराव मॅडम, ट्रेनी शिक्षिका रोहिणी श्रीधर काळे मॅडम आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!