शैक्षणिकसांस्कृतीक

स्वामी विवेकानंद विद्या मंदिर माध्यमिक विभाग या शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न,स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळतो- गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे 

केज/प्रतिनिधी

जीवन विकास शिक्षण मंडळ केज,संचलित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर [माध्यमिक विभाग] केज या शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५-२६ यावर्षांमधील स्नेहसंमेलन कार्यक्रम अत्यंत हर्षोत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सुनील केंद्रे गट शिक्षणाधिकारी,गटसाधन केंद्र पंचायत समिती केज तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून सौ.सिताताई बनसोड नगराध्यक्षा,नगर पंचायत केज या उपस्थित होत्या.तर इतर प्रमुख उपस्थितीमध्ये अंकुशराव इंगळे अध्यक्ष,जीवन विकास शिक्षण मंडळ तथा सभापती, कृषीउत्पन्न बाजार समिती, संस्थेचे सचिव जी.बी.गदळे, नारायणराव अंधारे, संस्थेचे संचालक तथा अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती [स्वयंअर्थसहायित शाळा] शैलाताई इंगळे अध्यक्षा,शालेय व्यवस्थापन समिती [ मा. वि.] केज,शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे,प्राथमिक विभागाचे मु.अ.वसंत शितोळे,गणेश कोकीळ संस्थेचे सहसचिव तथा मु.अ.स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल केज,शंकर भैरट प्राचार्य, स्व.प्रमोद महाजन कनिष्ठ महाविद्यालय केज, संघपाल मस्के मु.अ. स्वामी विवेकानंद विद्यामंदिर [स्वयंअर्थ सहायित शाळा] आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख उद्घाटक गट शिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे व शाळेतील विद्यार्थिनी यांच्या परंपरागत वंदनीय अभ्यागतम,सुस्वागतम या स्वागत गीताने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.यावेळी बोलताना सुनील केंद्रे म्हणाले की,स्नेहसंमेलना सारख्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कला गुणांना वाव मिळतो यामधून आदर्श कलाकार घडतात.जीवनामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नसते परंतु ती मिळविण्या साठी आपण सदैव कार्यमग्न असावे लागते.

अध्यक्षीय समारोपात सौ.सिताताई बनसोड म्हणाल्या की,या शाळे मध्ये खरोखरच केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य देखील रुजवले जातात.अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून आपल्या देशाची खरी संस्कृती,परंपरा जोपासली जाते.

सहभागी विद्यार्थ्यांनी शेतकरी,लोकगीत, राजस्थानी घूमर लोकगीत,काश्मिरी लोकनृत्य,मराठमोळी लावणी नृत्य,सादर केली. पोतराज लोकनृत्य प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरले.या नृत्यांमध्ये शाळेतील सहशिक्षक प्रबोधकांत समुद्रे यांनी देखील विद्यार्थ्यासमवेत पोतराज साकार केला. मराठी,हिंदी,लोकगीत, गोंधळ,भारुड अशाविविध गीतावर नृत्य सादर करून महाराष्ट्राची संस्कृती व परंपरांचे दर्शन उपस्थित प्रेक्षकांना झाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे,सहाय्यक कल्याण आदमाने यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!