आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न.

केज/प्रतिनिधी
आनंद ग्रामीण विकास प्रतिष्ठाण,आनंदगांव ता. केज.जि.बीड च्या वतीने दिनांक २४ मार्च २०२६ रोजी जागतिक क्षयरोग दिन जाणीव – जागृती घेऊन साजरा करण्यात आला.दिनांक २३ मार्च २०२६ रोजी जागतिक हवामान दिन साजरा करण्यात आला.दिनांक २२ मार्च २०२६ रोजी जागतिक जलदिन साजरा करण्यात आला. दिनांक २१ मार्च २०२६ रोजी जागतिक वनदिन साजरा करण्यात आला.
हे सर्व कार्यक्रम स्वानंद सार्वजनिक वाचनालय, आनंदगाव ता.केज जि. बीड येथील वाचन कक्षात आले.या विविध कार्यक्रम प्रचार – प्रसार, जाणीव – जागृती, परिसंवाद, चर्चासत्र, पथनाटय,व्याख्यान व इतर विविध उपक्रम राबवून लोकांमध्ये वरील संदर्भीय विविधविषयांची जाणीव – जागृती होऊन लोकचळवळ उभा रहावी व क्षयरोग निमूलन व्हावे, बदलत्या हवामानानुसार पिकपाण्यात बदल करता यावा,पाण्याचे महत्व कळावे व पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच आपल्या शेतातील झाडांचे जतन,संवर्धन करावे, झाडे तोडू नयेत अशा विविध विषयांची जागृती व्हावी हा उद्येश समोर ठेवून हो विविध उपक्रम राबविण्यात आले.
या विविध उपक्रमात, युवक,शेतकरी, शेतमजूर,जेष्ठ नागरीक, विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.संस्थेचे संस्थापक कार्यवाह, जेष्ठ समाजसेवक व जेष्ठ विचारवंत वसुदेव बप्पा गायकवाड, माजी सरपंच रामराजे गायकवाड, नारायण भाऊ गायकवाड, बाळासाहेब गायकवाड,अरुण गायकवाड,एस.के. वैरागे, वेदिका गायकवाड,श्रद्धा गायकवाड,शिवतेज गायकवाड, lआनंद भैय्या गायकवाड, यशवंत सौदागर,समर्थ गायकवाड, विक्रम गायकवाड,सुभाष गायकवाड,बालाजी टिंगरे,श्रुती पुंड,ज्ञानेश्वरी पुंड,रावसाहेब जाधव यांच्यासह मोठया संख्येने लोकसहभाग होता.



