सामाजिक
आडस-अंबाजोगाई मार्गावर जळालेली कार अपघातास कारणीभूत ठरण्याची भीती ; वाहन हटविण्याची नागरिकांची मागणी

केज/प्रतिनिधी
आडस-अंबाजोगाई रोडवरील शिवगड संस्थान उमराई परिसरा पासून काही अंतरावर एक कार जळालेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभी असल्याचे दिसून येत आहे.हे वाहन अनेक दिवसांपासून त्याचठिकाणी असल्याने वाहनचालक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रस्त्यालगत उभ्या असलेल्या याजळालेल्या कारमुळे रात्रीच्या वेळी किंवा भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात गंभीर अपघात घडू शकतो, अशी भीती स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या कडेला उभे असलेले जळालेले वाहन हटवावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. वेळेत कारवाई झाल्यास संभाव्य अपघात टाळण्यासाठी मदत होईल,असेही नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.



