सामाजिक

लोकमत सरपंच अवॉर्ड सोहळ्यात जल व्यवस्थापन क्षेत्रात सारणी (सांगवी) गावच्या सरपंच सौ. शिला ओव्हाळ जिल्ह्यात प्रथम! जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते ‘आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान,सारणी गावकऱ्यांकडून जल्लोष सर्व स्तरातून होत आहे अभिनंदनाचा वर्षाव

केज/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ‘लोकमत सरपंच अवॉर्ड्स’ (सीझन-५) चा दिमाखदार गौरव सोहळा शनिवार,दि.१३ जून २०२६ रोजी बीड येथील सम्राट मंगल कार्यालय येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात बीड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सरपंचांचा गौरव करण्यात आला.यामध्ये ‘जल व्यवस्थापन’ या अत्यंत महत्त्वाच्या कॅटेगरीत केज तालुक्यातील सारणी (सांगवी)गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. शिला राहुल ओव्हाळ यांनी बाजी मारत बीड जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या शुभहस्ते आणि अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत सौ.शिला ओव्हाळ यांना हा मानाचा आदर्श सरपंच पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

१४ कॅटेगरीमधून झाली निवड

‘सरपंच ऑफ द इयर’ सीझन-५ अंतर्गत बीड जिल्ह्यातील ग्राम पंचायतींकडून एकूण १४ वेगवेगळ्या कॅटेगरीमधून प्रस्ताव मागवण्यात आले होते.यामध्ये जल व्यवस्थापन,वीज व्यवस्थापन,सौरऊर्जा, शैक्षणिक सुविधा, स्वच्छता,आरोग्य आणि पायाभूत सेवा अशा अनेक घटकांचा समावेश होता.याअत्यंत चुरशीच्या स्पर्धेत सारणी (सांगवी) ग्रामपंचायतीने जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट आणि पथदर्शी कामाची दखल घेत परीक्षकांनी त्यांना जिल्ह्यातून प्रथम क्रमांकासाठी निवडले.

राज्यस्तरीय स्पर्धेत करणार बीडचे प्रतिनिधित्व

जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावल्यामुळे आता सौ.शिला राहुल ओव्हाळ या आगामी राज्यस्तरीय सरपंच अवॉर्ड्स स्पर्धेत संपूर्ण बीड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.त्यांच्या या यशाने केज तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात सारणी गावचे नाव उंचावले आहे.

गावकऱ्यांकडून जल्लोष आणि अभिनंदन

हा पुरस्कार स्वीकारताना सरपंच सौ.शिला ओव्हाळ यांच्या सोबत सारणी (सांगवी) गावचे ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्काराची घोषणा होताच कार्यक्रमस्थळी आणि सारणी गावात गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.गावाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या सरपंच सौ.शिला ओव्हाळ आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभेराहणाऱ्या सर्व गावकऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!