अनिल वैरागे,गौतम खंडागळे यांच्यासह बीड जिल्ह्यातील तीनजण कलावंत कलारत्न पुरस्काराने सन्मानित

केज/प्रतिनिधी
एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र आयोजित जीवन गौरव, राष्ट्रीय एकतारत्न,समाज रत्न, कलारत्न व राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार वितरण सोहळा दि.११ जून २०२६ रोजी मराठी पत्रकार भवन म.न.पा मार्ग आझाद मैदान मुंबई या ठिकाणी प्रतिष्ठित मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती व सहकार मंत्री महा.राज्य मुंबई मा.ना.बाबासाहेब पाटील तसेच मा.आ. विक्रमजी काळे शिक्षण आमदार छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार ५७ व्यक्तींना देण्यात आला तसेच मा.सुधाकर जी शर्मा ज्येष्ठ गीतकार बॉलीवूड मुंबई तसेच मा. अली खान सिने अभिनेते बॉलिवूड मुंबई मा.सय्यद अली मुंबई विभाग अध्यक्ष एकता सेवाभावी संस्था यांची देखील उपस्थितीत होती.या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अगदी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला हा पुरस्कार विविध क्षेत्रातील पारंगत व्यक्तींना देण्यात आला .
यामध्ये श्री.अनिल वैरागे, गौतमजी खंडागळे व बीड जिल्ह्यातील गायिका ललिता लांडगे निशा उजगरे यांना कला क्षेत्रातील कलारत्न हा पुरस्कार देण्यात आला तर सुनीता बोधने यांना कलासमाज रत्न पुरस्कार देण्यात आला यावेळी मा.सहकार मंत्री बाबासाहेब पाटील व आमदार विक्रम जी काळे यांनी आलेल्या सर्व पुरस्कार विजेत्यांचे शब्द सुमनाने स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.यावेळी या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातीहल मान्यवर मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.



