क्रिडासामाजिक

वल्ड चॕंम्पीयनशिप स्पर्धेत दोन सुवर्णपदके मिळविणाऱ्या हिंदवी चौरेचा केज येथे सत्कार संपन्न 

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील हिंदवी परमेश्वर चौरे हिने अहमदाबाद येथे झालेल्या वल्ड योगासना चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्णपदके जिंकून भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावला. बीड जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या हिंदवी चौरे हिला लोकप्रतिनिधींनी आर्थिक मदत करण्याची गरज आहे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

केज शहरातील सक्रिय पत्रकार भवन येथे हिंदवी चौरे हिचा सक्रिय पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष गालफाडे, माजी अध्यक्ष डी.डी. बनसोडे,अधिस्वीकृती पत्रकार महादेव गायकवाड,पत्रकार हनुमंत सौदागर,इकबाल शेख यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.त्याच बरोबर केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुश इंगळे, जीवन शिक्षण मंडळाचे सचिव जी.बी.गदळे, तालुका क्रीडा समन्वयक विनोद गुंड,पत्रकार चंद्रकांत पाटील यांनी सत्कार केला.

अंकुशराव इंगळें कडून ११ हजाराची मदत 

केज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अंकुशराव इंगळे यांनी हिंदवी चौरे हिचा सत्कार करून तिला पुढील तयारीसाठी ११ हजार रुपयांची मदत दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.हनुमंत सौदागर यांनी केले तर अंकुशराव इंगळे यांनी हिंदवीचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार डी.डी.बनसोडे, जी.बी.गदळे सर यांनी हिंदवीच्या यशाबद्दल कौतुक करत पुढील भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!