
केज/प्रतिनिधी
प्रवाशांच्या सुविधांसाठी शौचालय वापर मोफत करण्याच्या घोषणा झाल्या नंतरही केज बसस्थानकातील परिस्थितीत बदल झालेला दिसत नाही. बसस्थानकातील शौचालय वापरण्यासाठी महिला व पुरुष प्रवाशां कडून अद्यापही पैसे घेतले जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
शासनाकडून प्रवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले असताना ही केज बसस्थानकात शौचालयासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेषतः महिला प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन प्रवाशांची होणारी गैरसोय थांबवावी,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.आता एसटी महामंडळ व स्थानिक प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.दरम्यान परिवहन मंत्री यांनी बस स्थानकातील स्वच्छता गृह मोफत प्रवाशांना उपलब्ध करून देण्याची घोषणा केली असताना प्रवाशांकडुन वसुली कशासाठी असा सवाल प्रवासी व्यक्त करत आहेत.



