
केज/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील पोलीस दलात झालेल्या बदला नंतर कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे शेख असद यांनी केज पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे.शेख असद यांनी आपल्या पोलीस सेवेत विविध ठिकाणी काम करताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे.नांदेड येथे गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असताना उत्कृष्ट तपास केल्याबद्दल त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच अंबाजोगाई येथेही त्यांनी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली.
नुकतीच त्यांची अंबाजोगाई येथून केज पोलीस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक पदावर बदली झाली होती.पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केज परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.दरम्यान, त्यांच्या नियुक्तीमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमधून त्यांच्या कामगिरीबाबत अपेक्षा व्यक्त होत आहेत.



