सामाजिक

मुख्याध्यापक बबनराव आंधळे यांना मानाचा राज्यस्तरीय युवा लोकमित्र समाजरत्न पुरस्कार २०२६ जाहीर, २५ वर्षांपासून वंचित घटकांसाठी अविरत संघर्ष,शैक्षणिक क्रांती आणि सहकार क्षेत्रातील दीपस्तंभाचा २० जून रोजी बीडमध्ये होणार भव्य गौरव

बीड/प्रतिनिधी

गेल्या अडीच दशाकां पासून बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सहकार क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा आणि धगधगत्या संघर्षाचा ठसा उमटवणारे संत तुकाराम प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रा. आश्रुबा बबनराव दगडू आंधळे यांना यंदाचा अत्यंत प्रतिष्ठित आणि मानाचा राज्यस्तरीय ‘युवा लोकमित्र समाजरत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे.

साप्ताहिक युवा लोकमित्र वृत्तपत्राच्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ‘युवा लोकमित्र परिवार’च्या उच्चस्तरीय पुरस्कार निवड समितीने प्रा. बबनराव आंधळे यांच्या अष्टपैलू जीवनप्रवासाची दखल घेत या सर्वोच्च पुरस्कारासाठी त्यांची एकमुखाने निवड केली आहे.बबनराव आंधळे यांनी १४ जून १९९३ रोजी अरुणा असफअली महिला मंडळ बीड संचलित ‘संत तुकाराम प्राथमिक विद्यालय’ तेलगाव रोड,बीड येथे मुख्याध्यापक म्हणून सूत्रे हाती घेतली.आज तागायत त्यांनी आपल्या कुशल प्रशासकीय आणि संवेदनशील नेतृत्वाने हजारो गरीब, मागासवर्गीय व वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण्याच्या मुख्य प्रवाहात आणले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मागासवर्गीय वस्तीगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच मोलाचे सहकार्य केले आहे.

बबनराव आंधळे हे केवळ चार भिंतीच्या आतले शिक्षक नसून रस्त्यावरील संघर्षाचे नेते आहेत.ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, रस्ता रोको,मोर्चे आणि आंदोलनात ते नेहमीच अग्रभागी राहिले.शिक्षण क्षेत्रातील न्याय्य हक्कांसाठी त्यांनी भिक मांगो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला,तर अन्नदात्या शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी चळवळीत अनेक आंदोलने उभी केली.

१९९७-९८ मध्ये त्यांनी बीडजिल्हा जनता दलाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले,तर स्व.रामविलास पासवान दूरसंचार मंत्री असताना त्यांची दूरसंचार सल्लागार समितीवर देखील निवड झाली होती.सध्या ते लोकजन शक्ती पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष म्हणूनही कार्यरत आहेत.सहकार क्षेत्रात प्रा.बबनराव आंधळे यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.सन २०२५ मध्ये झालेली त्यांची बीड जिल्हा सहकार बोर्डावर संचालक म्हणून बिनविरोध निवड,ही त्यांच्या लोकप्रियतेची मोठी पावती आहे.गेल्या १५ वर्षांपासून ते अरुणा असफ अली शिक्षण संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून यशस्वी धुरा सांभाळत आहेत.

याशिवाय प्रगती सहकारी जिनिंग-प्रेसिंग, सावता नागरी सहकारी पतसंस्था,आणि महात्मा फुले सहकारी साखर कारखाना नागऱ्याची वाडी यांसारख्या संस्थांच्या संचालक मंडळावर त्यांनी आपल्या सहकार कौशल्याची चुणूक दाखवली आहे.ग्रामीण युवकसंघटनेच्या माध्यमा तून २५ वर्षांपासून गरजू -वंचितांना मदत,रक्तदान शिबिरे,आणि क्रीडा सप्ताहांचे आयोजन करणाऱ्या बबनराव सरांनी २०२५-२०२६ पासून बानेगावात एक ऐतिहासिक उपक्रम सुरू केला आहे.गावात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे थेट १०,००० रुपयांची एफ.डी.(Fixed Deposit) करून त्यांनी बेटी बचाओ,बेटी पढाओ चा नारा प्रत्यक्ष कृतीत आणला आहे.

बानेगाव ग्रामपंचायतीमध्ये सन २००० पासून ते आज तागायत सलग ग्रामपंचायत सदस्य म्हणून लोकसेवेत सक्रिय आहेत.गावात कौलेश्वर मंदिराची स्थापना,संत भगवान बाबा सार्वजनिक वाचनालय, नंदीग्राम शेळीमेंढी पालन संस्था आणि जयभवानी महिला दूध संस्थेची स्थापना करून त्यांनी ग्रामीण अर्थ व्यवस्थेला बळकटी दिली आहे.२० जून रोजी बीडच्या ताज पॅलेस मध्ये गौरव हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा शनिवार,२० जून २०२६ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता ताज पॅलेस, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला राजकीय,सामाजिक, शैक्षणिक,पत्रकारिता आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.हा सर्वोच्च समाजरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संपूर्ण बीड जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळ,सहकार क्षेत्र,ओबीसी समाज, शेतकरी संघटना आणि बानेगाव ग्रामस्थांकडून प्रा.बबनराव आंधळे यांच्यावर अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!