शैक्षणिकसामाजिक

पेशवा प्रतिष्ठानच्या बिनव्याजी शैक्षणिक मदत योजनेचे पहिले यश ; विद्यार्थ्याचे एमबीबीएस शिक्षण पूर्ण

अंबाजोगाई/प्रतिनिधी

शिक्षणाच्या माध्यमातून समाजातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक बळ देण्याच्या उद्देशाने पेशवा प्रतिष्ठान, अंबाजोगाई यांनी सुरू केलेल्या बिनव्याजी शैक्षणिक मदत योजनेचा पहिला विद्यार्थी डॉ.पवन पंढरीनाथ कुलकर्णी हा आता वैद्यकीय शिक्षण (एमबीबीएस) पूर्ण करून डॉक्टर झाला आहे.ही बाब प्रतिष्ठान साठी तसेच संपूर्ण अंबाजोगाई परिसरा साठी अभिमानास्पद ठरली आहे.

आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची स्वप्ने अपूर्ण राहतात.ही गरज ओळखून पेशवा प्रतिष्ठान ने काही वर्षांपूर्वी बिनव्याजी शैक्षणिक मदत योजना सुरू केली.या योजने अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना कोणतेही व्याज न आकारता आर्थिक मदत देण्यात येते,ज्यामुळे त्यांना शिक्षणाचा प्रवास निर्धास्तपणे पूर्ण करता येतो.या योजनेचा लाभ घेणाऱ्या पवन कुलकर्णी या पहिल्या विद्यार्थ्याने एमबीबीएस पदवी यशस्वीरित्या संपादन करून प्रतिष्ठानच्या कार्याची सार्थता सिद्ध केली आहे.

पवन कुलकर्णी यास मागील चार वर्षापासून दरवर्षी पन्नास हजाराची बिन व्याजी शैक्षणिक मदत करण्यात येते. विद्यार्थ्याच्या या यशामुळे इतरविद्यार्थ्यांना ही प्रेरणा मिळणार असून समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा शैक्षणिक उपक्रमांना अधिकाधिक सहकार्य केल्यानेच सदरील उपक्रम सुरू आहे.पवन कुलकर्णी याने पेशवा प्रतिष्ठान व या उपक्रमास मदत करणाऱ्या दानशूर व्यक्तींचे आभार व्यक्त केले.यावेळी पेशवा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करताना सांगितले की, “शिक्षण हीच खरी समाजसेवा असून गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याचा आमचा संकल्प यापुढेही कायम राहील.पेशवा प्रतिष्ठान अश्याच समाजपयोगी कार्यासाठी कायम अग्रेसर राहील.”

विद्यार्थ्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विविध सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे तसेच पेशवा प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे. अधिक माहितीसाठी अमृत महाजन,सुजित दीक्षित,संतोष कुलकर्णी, राहुल कुलकर्णी,डॉ. महेश अकोलकर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!