सामाजिक

किल्ले धारूरकरांचा वीज प्रश्नावर एल्गार,मागणी मान्य न झाल्यास उपोषणाचा इशारा

किल्लेधारूर/प्रतिनिधी

किल्ले धारूर शहरातील गंभीर अशी वीजसमस्या निर्माण झाली आहे. यामुळे शहरातील प्रत्येक नागरिक तसेच छोटे मोठे व्यापारी हे देखील परेशान झालेले आहेत शहरातील नागरिकांच्या वतीने यापूर्वीही निवेदन देण्यात आले तोंडी मागणी करण्यात आली परंतु अद्याप पर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे शहरातील नागरिक बुधवार दि.१० जुन रोजी प्रचंड आक्रमक होऊन नागरिकांनी मागणी पूर्ण करण्यासाठी महा वितरणला निवेदन देण्यात आले त्याच बरोबर आमच्या मागण्यांची पूर्तता १५ दिवसात न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला.किल्ले धारूर तालुका विकास संघर्ष समितीच्या वतीने महा वितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत १५ दिवसात१० एमव्हीए चे २ नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली.ही मागणी मान्य न झाल्यास समितीच्या वतीने उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला.

सामाजिक कार्यकर्त्या द्वारे स्थानिक आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्याशीही दूरध्वनी वरून चर्चा करून तातडीने प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली.सदर निवेदनाची प्रत तहसीलदार धारूर व पोलिस निरीक्षक धारूर यांना देखील देण्यात आली.या प्रसंगी किल्ले धारूर तालुका विकास संघर्ष समितीचे प्रा.नितेंद्र शुक्ला,संदीप भैया शिनगारे,सुनील कोमटवार,प्रशांत शिनगारे,योगेश अंधारे, दादा शेरकर,प्रवीण भैरे, कृष्णा महाजन,हनुमंत अंधारे,ॲड.युवराज फुन्ने, संदीप खिलोजी,सचिन बैरागी,आप्पा गुळवे, रोहित फावडे,स्वप्नील धनवडे यांच्यासह असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!