दैनिक ‘समर्थ राजयोग’चे संपादक वैभवजी स्वामी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव;विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती

बीड/प्रतिनिधी
दैनिक ‘समर्थ राजयोग’ आणि साप्ताहिक ‘शिववाणी’चे संस्थापक संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेश संपर्कप्रमुख आदरणीय वैभवजी स्वामी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बीड येथे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांची भेट घेऊन त्यांना दीर्घायुष्या च्या आणि यशस्वी वाटचालीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या लेखणीच्या व कार्याच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेला वेगळा ठसा या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाला.
या सदिच्छा भेटीदरम्यान काँग्रेस पक्षाचे बीड शहराध्यक्ष तथा ख्यातनाम उद्योजक परवेज भाई कुरेशी,’लेक लाडकी’ अभियानाचे बाजीराव ढाकणे,ज्येष्ठ पत्रकार किशोर देवा कुलकर्णी,’जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल’च्या संपादिका ज्योती तुसांबड आणि सनी तुसांबड आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वैभवजी स्वामी साहेब यांचा सत्कार करण्यात आला.स्वामी साहेबांनी पत्रकारितेच्या माध्यमा तून नेहमीच सर्व सामान्यांचे प्रश्न प्रशासनासमोर मांडले आहेत.तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हितासाठी त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे,अशा भावना यावेळी परवेज भाई कुरेशी व इतर मान्यवरांनी व्यक्त केल्या.
वाढदिवसाचे औचित्य साधून दिवसभर बीड शहर व जिल्ह्यातील राजकीय,सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी स्वामी साहेब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या सर्व स्नेहाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल वैभवजी स्वामी यांनी उपस्थितांचे व हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.



