सामाजिक

मुंबईतील मुस्लिम कॉन्फ्रेंसमध्ये आमदारांना समाजासाठी अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवावा व तौहीद खानचा विषय विधीमंडळात लक्षवेधी करण्याची मागणी -संघर्षयोध्दा इलियास इनामदार

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजावर होणा-या अन्याय अत्याचारावर तोडगा काढण्यासाठी मुंबईतील इस्लाम जिमखाना येथे फेडरेशन ऑफ मुस्लिम महाराष्ट्र संघटनेच्या वतीने राज्य स्तरीय मुस्लिम कॉन्फ्रेंसचे आयोजन करण्यात आले होते.कॉन्फ्रेंसचे विषय होते एस आई आर जनगणना जनजागृती धर्मांतरण व मॉबलिचींग पासुन बचाव हे विषय होते कॉन्फ्रेंसमध्ये अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीचे अमीर मुज्तबा अहमद खान सर व मार्गदर्शक शेख मुसा सर यांच्या मार्गदर्शना खाली एक शिष्टमंडल समितीच्या वतीने संघर्ष योध्दा इलियास इनामदार यांच्या नेतृत्वाखाली कॉन्फ्रेंसमध्ये सामिल झाले .

यावेळी कॉन्फ्रेंस मध्ये संघर्षयोध्दा इलियास इनामदार यांनी राज्यातील तमाम संघटनेच्या नेत्यांना पदाधिकारी यांना समाजावर होणा-या अन्याय अत्याचारावर जसे दंगली, मॉबलिचिंग हेटस्पिच,सोशल मीडिया वर वादग्रस्त पोस्ट धर्मगुरु,धर्मग्रंथ धार्मिक स्थळांवर होणारे हल्ले बुलडोजर कारवाई प्रत्येक वस्तुला जिहादशी जोडणे समाजावर गांव खेडयामध्ये बहिष्कार टाकण्याचा असंवैधानिक प्रयत्न व शासनाचा प्रशासनाचा याला छुपा पाठिंबा हे येणाऱ्या काळामध्ये देशासाठी व देशाच्या एकता,अखंडते साठी घातक ठरणार आहे असे संघर्षयोध्दा इलियास इनामदार यांनी सांगितले.

यासाठी दि.२२ जुन पासुन विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन होणार आहे. अल्पसंख्यांक संरक्षण संघर्ष समिती अधिवेशना वेळी मुंबईच्या आझाद मैदानावर शासनाने अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवावा व या कायद्याद्वारे समाजाचे रक्षण व्हावे या मागणी साठी उपोषणाद्वारे आंदोलन करणार आहे सोबतच परळीतील शहीद युवक कुठे न कुठे मॉबलिचींगचा शिकार झालेला आहे अशी जिल्हाभर चर्चा आहे. याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व मुस्लिम आमदारांनी अधिवेशना वेळी या विषयाला लक्षवेधी करावे अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

या कॉन्फ्रेंसमध्ये राज्यातील मुस्लिम समाजासाठी शैक्षणिक सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे अनेक मान्यवर धर्मगुरु स्कॉलर सामाजिक राजकीय नेते विशेष करुन महाराष्ट्रातील मान्यवर आमदार उपस्थित होते. अल्पसंख्याक संरक्षण संघर्ष समितीचा शिष्टमंडळ मुंबईच्या कॉन्फ्रेंसमध्ये जावे. आपल्या आंदोलनाचा विषय कॉन्फ्रेंसमध्ये ठेवावा यासाठी जिकरीचे प्रयत्न करणारे जमात ए इस्लामीचे व आमचे शुभचिंतक शफिक हाशमी सर यांचे आभार शिष्टमंडळात सोबत मुशीर इनामदार,सलीम खान,शेख ऐतेशाम, सय्यद शफिक,अलमास मोहम्मद अली,बागे सय्यद नबीलुज्जमा होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!