कृषीसामाजिक

शेतकऱ्यांनी कडधान्य प्रक्रिया केंद्रासाठी अर्ज सादर करावेत – बबनराव आंधळे

बीड /प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कडधान्य पिकांच्या मूल्यवर्धनास चालना देऊन शेतकऱ्याचे उत्पन्न वाढविणे या उद्देशाने काढणीनंतरची पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी कडधान्य प्रक्रिया युनिट स्थापन करण्यासाठीचे अर्ज दिनांक ३० जून २०२६ पर्यंत करणे आवश्यक आहे तरी बीड जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी आपापल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करावेत असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेच्या वतीने बबनराव आंधळे यांनी केले आहे या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था क्लस्टर तर महासंघ प्राथमिक कृषी पतसंस्था उद्योजक तसेच प्रक्रिया युनिट स्थापन करण्यास इच्छुक इतर पात्र व्यक्ती संस्था यांना सहाय्य देऊन कडधान्य मूल्यसाखळी अधिक कार्यक्षम सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे.

या योजने अंतर्गत शेतकरी उत्पादक संस्था कृषी पतसंस्था वैयक्तिक कोणत्याही अधिनियमा अंतर्गत नोंदणीकृत इतर उपक्रम घटकांना आर्थिक साह्य देण्यात येईल गट लाभार्थी संबंधित संस्था किमान मागील दोन वर्षापासून विधिवत नोंदणीकृत व कार्यरत असणे आवश्यक आहे प्रकल्प खर्चाच्या किमान १५ टक्के रक्कम तसेच कार्य भांडवलासाठी आवश्यक मार्जिन मनी स्वतः उभारण्याची आर्थिक क्षमता असावी तरी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा बीड जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक बबनराव आंधळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!