सामाजिक

कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासाठी राज्यातील सर्वच आरटीओ कार्यालयाचे कामकाज ९ जून रोजी कामबंद आंदोलन 

अंबाजोगाई/प्रतिनिधी

राज्यातील सर्वआरटीओ कार्यालयांचे कामकाज ९ जून रोजी बंद रहाणार आहेत.महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या दीर्घकालीन प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्य भरातील सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) दिनांक ९ जून २०२६ रोजी एक दिवसाचे कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.संघटनेच्या म्हणण्यानुसार, कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी यापूर्वी अनेक वेळा निवेदने,आंदोलने, मोर्चे व विविध प्रकारची आंदोलनात्मक पावले उचलण्यात आली.मात्र प्रशासनाकडून मागण्यां कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

विशेषतः कनिष्ठ लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदांचे पदनाम अनुक्रमे परिवहन सहाय्यक व वरिष्ठ परिवहन सहाय्यक असे बदलणे,तसेच विभागाचा नवीन आकृतीबंध मंजूर होऊन चार वर्षांहून अधिक कालावधी लोटला असतानाही त्याचा प्रत्यक्ष लाभ कर्मचाऱ्यांना मिळालेला नाही.सेवा प्रवेश नियम तयार नसल्याचे कारण पुढे करून पदोन्नत्या रखडविण्यात आल्याने पात्र कर्मचारी पदोन्नती पासून वंचित राहत असल्याची नाराजी संघटनेने व्यक्त केली आहे.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने ९ जून रोजी राज्यव्यापी कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला असून,उप प्रादेशिक परिवहन कार्यालय,अंबाजोगाई येथील सर्व कर्मचारी देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

संघटनेने शासनास इशारा देताना सांगितले की,आंदोलना नंतरही मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढला गेला नाही,तर पुढील काळात बेमुदत संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात येईल.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या

कनिष्ठ लिपिक व वरिष्ठ लिपिक या पदांचे पदनाम अनुक्रमे परिवहन सहाय्यक व वरिष्ठ परिवहन सहाय्यक असे करावे.मंजूर झालेल्या आकृतीबंधा नुसार सेवा प्रवेश नियम तात्काळ लागू करावेत.

पात्र कर्मचाऱ्यांना कार्यालयीन अधीक्षक व वरिष्ठ लिपिक पदांवर तात्काळ पदोन्नती द्यावी.

प्रशासकीय अधिकारी पदावरील पदोन्नत्या तात्काळ करण्यात याव्यात.कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत शासनाने त्वरित निर्णय घ्यावा,अशी मागणी संघटनेचे अप्रोज सिद्दिकी,सिद्धेश्वर घुले सूर्यकांत पाटील,सुरवसे अशोक बोलचटवार, अर्चना नरारे,पाटील यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!