सामाजिक

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते ॲड.शामभाऊ तांगडे यांच्या वाढदिवसा निमित्त पत्रकारांचा सन्मान,सन्मानचिन्ह व ‘जनता’ पुस्तक देऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पत्रकारांचा गौरव

अंबाजोगाई/प्रतिनिधी

आंबेडकरी विचारांची चळवळ सातत्याने पुढे नेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ॲड.शामभाऊ तांगडे यांच्या वाढदिवसा निमित्त संघर्षभूमी येथे पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.भीम जयंतीनिमित्त दरवर्षी १ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत आयोजित विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे वृत्तांकन करून ते जनतेपर्यंत पोहोचविणाऱ्या पत्रकारांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमात पत्रकारांना सन्मानचिन्ह तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारे ‘जनता’ हे पुस्तक भेट देण्यात आले.समाजप्रबोधन, सामाजिक न्याय आणि आंबेडकरी विचारांच्या प्रसारासाठी पत्रकारांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.यावेळी दैनिक बीडसत्ता अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी प्रशांत मस्के, दैनिक न्याय टाईम्स अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी व्यंकटेश जोशी,दैनिक मराठवाडा साथी अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी प्रशांत लाटकर तसेच दैनिक पुण्यनगरीचे अंबाजोगाई प्रतिनिधी दिलीप आरसुळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या समाजाभिमुख कार्याचे कौतुक करताना लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारितेची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.तसेच आंबेडकरी चळवळीच्या विचारांचा प्रसार करण्यामध्ये माध्यमांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे मत व्यक्त केले.या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तसेचआंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ॲड.शामभाऊ तांगडे यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित हा पत्रकार सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!