

केज/प्रतिनिधी
बहुजन क्रांती मोर्चा तसेच लहुजी क्रांती मोर्चा जिल्हा बीड यांच्या वतीने जुन-२०२६ च्या पहिल्या आठवड्यामध्ये इयत्ता दहावी व बारावी या वर्गात ९० टक्केच्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे.गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,महापुरुषांचे चरित्र ग्रंथ,भारतीय सविंधान,प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या शुभ हस्ते देण्यात येणार आहे.
तरी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये दहावी व बारावी परीक्षेत ९० टक्केच्या वर गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व पालकांनी अस्मिता प्रतिष्ठान,शिवाजी नगर, बीड व केदारेश्वर ऑन लाईन सेवा केंद्र,बीड रोड,केज येथे गुणपत्रिका ची सत्यप्रत देऊन नोंदणी करावी असे आवाहन संयोजन समितीचे बाबुराव गालफाडे सर, प्रा.रमेश पाटोळे सर, संभाजी शिंदे,प्रा.पांडुरंग सुतार,प्रा.विक्रम गालफाडे, ईरफान पठाण, अनिल लोखंडे,पांडुरंग कसबे,अजय गालफाडे, लखन मस्के,आदित्य जोगदंड यांनी केले आहे अशी माहिती बाबुराव गालफाडे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.



