स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न


केज/प्रतिनिधी
केज येथे दि.३ फेब्रुवारी २०२६ मंगळवार रोजी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मध्ये वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. बनसोडे साहेब पोलीस उप निरीक्षक केज व कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन विकास शिक्षण मंडळाचे सचिव श्री.जी.बी.गदळे सर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यकमाला प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री.अंकुशराव अण्णा इंगळे,नारायण राव अंधारे,श्रीमती शैलजाताई इंगळे,पालक प्रतिनिधी श्री.अशोक सोनवणे, श्री.नारायण देवा लोंढे यांची उपस्थिती होती.या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री.गणेश कोकिळ सर,श्री.विनोद गुंड सर यांनी केले.या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना श्री.जी.बी.गदळे सर यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरची व अभ्यासाची महिती दिली. कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. बनसोडे साहेब यांनी विद्यार्थी मधील विविध कलागुणांसाठी शुभेच्छा दिल्या.या वार्षिक स्नेह संमेलनामध्ये विद्यार्थीनी मराठी गीत,लावणी, नाटक, गोंधळ व हिंदी गाण्यावर नृत्य सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी कु.अथर्व गवळी,कु.देवयानी इंगळे, कु.हर्षदा नेहरकर,कु. समृध्दी गायकवाड व सौ. कल्याणकर मॅडम यांनी केले.या कार्यक्रमासाठी श्री.कदम सर,श्री.मैंद सर, श्री.तांदळे सर,सौ.काळे मॅडम,सौ.नाईकवाडे मॅडम,सौ.विटेकर मॅडम, सौ.लोखंडे मॅडम,सौ. काळे मॅडम,थोरात मॅडम, सौ.ठोंबरे मॅडम,सौ. कापसे मॅडम,सौ. स्वंराजली मॅडम,सौ. सावंत मॅडम,सौ.राऊत मॅडम,सौ.जाधव मॅडम, महाजन मॅडम,शिक्षक व शिक्षका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य केले.


