क्रिडासामाजिक

केजमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीगचा दिमाखदार सोहळा संपन्न! दहा संघांमध्ये रंगणार क्रिकेट चा थरार ; मान्यवरांच्या उपस्थितीत चौथ्या वर्षाचे थाटात उद्घाटन

केज/प्रतिनिधी

केज शहरातील क्रिकेट प्रेमींसाठी पर्वणी ठरलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग (APL) वर्ष ४ थे चा शानदार उद्घाटन सोहळा गुरुवार,दि.५ फेब्रुवारी २०२६ रोजी स्व. अजित दादा पवार स्टेडियम (पंचायत समिती केज) येथे उत्साहात पार पडला.आयपीएलच्या धर्तीवर खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत यंदा १० कसलेल्या संघांनी सहभाग नोंदवला असून, केजकरांना पुढील काही दिवस क्रिकेटची मेजवानी मिळणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती आणि उद्घाटन

या स्पर्धेचे उद्घाटन बाळराजे आवारे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटनेते हारुणभाई इनामदार, नगराध्यक्षा सौ.सिताताई बनसोड,युवा नेते राहुल भैय्या गदळे,सरपंच अमोल भैय्या डोईफोडे, व्यंकट हजारे आणि समिर पाशा (पोलीस) यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांनी आपल्या मनोगतातून खेळाडूंना शुभेच्छा देत, अशा क्रीडा स्पर्धांमुळे शहरातील तरुण कौशल्याला वाव मिळत असल्याचे प्रतिपादन केले.

ज्येष्ठ खेळाडूंचा यथोचित सन्मान

मैदानावर घाम गाळणाऱ्या आणि क्रिकेटमध्ये योगदान देणाऱ्या जेष्ठ खेळाडूंचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.यामध्ये प्रामुख्याने अकबर इनामदार,प्रकाश मुंडे,बंडू मस्के,शेख जफर,फस्सी मौजन,प्रशांत जाधव, प्रेमजीत हजारे,पाशा शेख आणि इतर खेळाडूंचा समावेश होता.

आयोजनाचा थाट आणि चुरस

लखन हजारे (बहुजन विकास मोर्चा) व ब्लू स्टार ग्रुप यांच्या वतीने या स्पर्धेचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. लखन हजारे,मुन्ना शिंदे, जहीर हाफी साहेब,प्रविण मस्के आणि प्रितम साळवे यांच्या अथक परिश्रमातून ही स्पर्धा साकारली जात आहे.या स्पर्धेचे स्वरूप व्यावसायिक असून, प्रत्येक सामना अटी तटीचा होणार आहे.

शहरातील तरुणांना एक हक्काचे व्यासपीठमिळावे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना खेळाच्या माध्यमातून अभिवादन करावे,या उद्देशाने या लीगचे आयोजन करण्यात आले आहे.- हारुणभाई इनामदार गटनेते,केज दहा संघांच्या या लढतीत विजेतेपद कोण पटकावणार,याकडे आता संपूर्ण केज शहराचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!