राजकीयसामाजिक

डॉ.प्रतिभाताई थोरात यांचा शिवसेनेच्या वतीने सत्कार संपन्न 

केज/प्रतिनिधी

डॉ.सौ.प्रतिभाताई अशोक थोरात यांनी शिवसेना पक्षात मुंबई येथे पक्षप्रमुख उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केल्याबद्दल त्यांचा केज तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी शिवसेना उपनेत्या माजी आमदार संगीताताई ठोंबरे, शिवसेना तालुकाप्रमुख पृथ्वीराज पाटील, शिवसेना विधानसभा प्रमुख दादासाहेब ससाणे, युवासेना तालुकाप्रमुख दत्तकुमार काकडे,शिवसेना उप तालुकाप्रमुख महेंद्र चाटे, युवासेना शहरप्रमुख आकाश चाळक, आम्रपालीताई गजेशीव, कुंबेफळचे माजी सरपंच किशोर थोरात,नवनाथ जाडकर,शुभम आप्पा गंभीरे,उमेश माने, विलास घुले व सर्व पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ.सौ. प्रतिभाताई थोरात यांनी सर्व शिवसेना पक्षप्रमुख उप मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आपल्यावर विश्वास टाकून शिवसेना पक्षात स्वागत केले आहे. शिवसेना पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच सर्वांचे आभार मानले आहेत.आभार प्रदर्शनाने सत्कार सोहळा संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!