स्वामी विवेकानंद शाळे मध्ये महाराष्ट्र दिना निमित्त विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न या प्रसंगी एनएमएमएस शिष्यवृत्तीधारक ८ विद्यार्थ्यांचा तसेच इतर गुणवंतांचा सत्कार करण्यात आला

केज/प्रतिनिधी
जीवन विकास शिक्षण मंडळ केज संचलित स्वामी विवेकानंद विद्या मंदिर [माध्यमिकविभाग] या शाळेमध्ये दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.याप्रसंगी जीवन विकास शिक्षण मंडळ संस्थेचे अध्यक्ष अंकुशरावजी इंगळे, शाळेचे माजी मु.अ. बाळासाहेब तिडके, सेवानिवृत्त सहशिक्षक हनुमंत घाडगे,प्राचार्य शंकर भैरट,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शैलाताई इंगळे, शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शाळेचे सेवानिवृत्त सहशिक्षक हनुमंत घाडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.कार्यक्रमाच्या पुढील सत्रात शाळेतील विविध स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ८ वी एन.एम. एम.एस. शिष्यवृत्तीधारक,विज्ञान प्रदर्शन स्पर्धेतील गुणवंत,शालेय मंत्रिमंडळातील उत्कृष्ट कार्य करणारे गुणवंत, तसेच इयत्ता ५ वी ते ११ वी वर्गातील गुणानुक्रमे आलेल्या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या एन.एम.एम. एस.या परीक्षेची निवड यादी दि. २४ फेब्रुवारी २०२६रोजी प्रसिद्ध झालेली आहे.या निवड यादीमध्ये शाळेतील एकूण आठ विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. यामध्ये- आर्यन अंगद मुंडे,यशश्री सतीश नेहरकर,ओमकार सूर्यकांत चाटे,सुधांशू अंगद भराडे,तुषार विलास पोवळे,तनुजा संतोषकुमार बियाणी, हरिओम गणेश गिरी, आर्या अमरदीप गायकवाड इत्यादी.
तसेच विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट व विलोभनीय असे प्रयोग सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी लेझर तंत्रज्ञानाद्वारे पाण्यातील जिवाणू ओळखणे,भूअंतर्गत भूकंपाच्या हालचाली, स्वामी विवेकानंद स्मार्ट स्कूल,व इतर असे उल्लेखनीय प्रयोग सादर केले.राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त विज्ञान प्रदर्शना मध्ये लहान गटातून स्वरा राऊत हिने प्रथम पारितोषिक पटकावले. सोहम कापरे,सार्थक चाळक यांनी द्वितीय तर अनुज चाळक व विराज शिंदे यांनी तृतीय पारितोषिक मिळविले. तर मोठ्या गटातून अजय आदमाने व अथर्व नेहरकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.तर हर्षदा शिरसट हिने द्वितीय पारितोषिक पटकाविले.सुदर्शन शिंदे, यशवंत पाळवदे यांनी तृतीय तर शौर्य बारगजे व वेदांत राऊत यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
शाळेच्या मंत्रिमंडळातील उत्कृष्ट मुख्यमंत्री पुरस्कार तसेच स्कॉलर स्टुडन्ट ऑफ द इयर हा पुरस्कार इयत्ता सातवी तील विद्यार्थीनी आर्या राजेंद्र लटपटे हिला मिळाला.उपमुख्यमंत्री- शौर्य भगवान बारगजे, शिक्षणमंत्री- गुंजन धनंजय घोळवे, अपूर्वा उत्तरेश्वर सोनवणे, नियोजनमंत्री-श्रावणी संतोष लोंढे,आरोग्यमंत्री- श्रेया उत्तरेश्वर धपाटे, वित्तमंत्री- किशोरी संदीप मुळे,गृहमंत्री- समृद्धी बालाजी नेहरकर, पर्यावरणमंत्री- सृष्टी गोरोबा अडसूळ, सांस्कृतिकमंत्री-संस्कृती सुजीत गायकवाड, प्रांजल चेतन जावळे, प्रसिद्धीमंत्री- तेजस्विनी भास्कर कापरे सदरील विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक प्रबोधकांत समुद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.वरील सर्व विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रबोधकांत समुद्रे यांनी केले तर आभार शाळेच्या मुख्याध्यापिका शिवनंदा मुळे यांनी मानले.


