नायगावच्या भूमिपुत्राची पोलिस दलात दमदार एन्ट्री ; जिद्द-मेहनतीचा विजय

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील नायगावचे भूमिपुत्र प्रशांत प्रभाकर कुलकर्णी याने महाराष्ट्र शासनाच्या पोलिस भरती प्रक्रियेत उल्लेखनीय यश मिळवत पोलिस दलात आपल्या जिद्दीच्या बळावर दमदार एन्ट्री केली आहे.त्यांची नियुक्ती जिल्हा पोलिस म्हणून मुंबईतील मीरा- भाईंदर येथे झाली असून,या यशामुळे संपूर्ण गावात आनंद व अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य कुटुंबातून येत प्रशांतने मोठी स्वप्ने पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी अविरत परिश्रम घेतले.स्पर्धेच्या कठीण टप्प्यांतून मार्ग काढताना त्याने जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाने अनेक अडचणींना न जुमानता त्यांनी सातत्याने अभ्यास व शारीरिक तयारी करत हे यश आपल्या नावावर केले.प्रशांतच्या निवडीने नायगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोचला असून,केज तालुक्याचे नावही उज्ज्वल केले आहे.त्याच्या प्रेरणादायी प्रवासामुळे अनेक युवकांना नवीन दिशा आणि उमेद मिळणार आहे.प्रशांतच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.



