सामाजिक

बीड जिल्ह्यात पेट्रोल – डिझेलचा तीव्र तुटवडा ; खासदार बजरंग सोनवणे यांचे तातडीने उपाय योजना करण्यासाठी केंद्राला पत्र

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा मोठ्याप्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे.या टंचाईमुळे शेतकरी, प्रवासी आणि वाहतूक दार यांचे प्रचंड हाल होत असून,या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी बीडचे खासदार बजरंग मनोहर सोनवणे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहून तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.टंचाईचा फटका सर्वसामान्यांना जिल्ह्या तील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सध्या शेती कामांचा महत्त्वपूर्ण हंगाम सुरू असल्याने डिझेलअभावी शेतीची कामे रखडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या जनक्षोभाची दखल घेत खासदारांनी हे पाऊल उचलले आहे. खासदारांच्या पत्रातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत.

तातडीचा पुरवठा 

तेल कंपन्यांना बीड जिल्ह्यासाठी पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा आणि नियमित पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत.

कायमस्वरूपी उपाय योजना 

भविष्यात अशा प्रकारचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी ठोस पावले उचलण्यात यावीत. तेल कंपन्यांना निर्देश इंडियन ऑईल,भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना याविषयाची प्रत पाठवून लक्ष घालण्यास सांगितले आहे.खासदार सोनवणे यांनी पत्रात नमूद केले आहे की,बीड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असून हा विषय तातडीचा आहे. इंधन तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिका मध्ये असंतोष वाढत आहे.केंद्र सरकारने यावर त्वरित कार्यवाही करून दिलासा द्यावा.या पत्राच्या प्रतिलिपी जिल्हाधिकारी,बीड तसेच प्रमुख तेल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.खासदारांच्या या पाठपुराव्यानंतर आता केंद्र सरकार आणि तेल कंपन्या काय पावले उचलतात,याकडे बीडकरांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!