स्वानंद सार्वजनिक वाचनालयात महाराष्ट्र दिन,आंतरराष्ट्रीय कामगार दिन,मराठी राजभाषा दिन,बुद्ध पौर्णिमा,कुर्म जयंती विविध सांस्कृतीक कार्यक्रमाने संपन्न

केज/ प्रतिनिधी
स्वानंद सार्वजनिक वाचनालय,आनंदगांव ता.केज जि.बीड येथे दि.१ मे २०२६ रोजी सरपंचांच्या अध्यक्षते खाली तर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन, आंतरराष्ट्रीय कामगार दिन,मराठी राजभाषा दिन,बुद्ध पौर्णिमा,कुर्म जयंती आदी ग्रंथप्रदर्शन, ग्रंथवाचन,कथाकथन, वक्तृत्व स्पर्धा,रंगभरण स्पर्धा इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम घेवून साजरा करण्यात आला.
अध्यक्षस्थानी सरपंच सौ.अंजना गोविंद गायकवाड या होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत अधिकारी श्री.डी.एस. सरवदे यांनी केले.प्रमुख पाहुणे म्हणून सौ.आचार्य व्ही.जी मुख्याध्यापिका सौ. देशमुख यु.एस.सह शिक्षिका,श्री.कळके एन. एस.सहशिक्षक,गोविंद गायकवाड यांची उपस्थिती होती.स्वानंद सार्वजनिक वाचनालय गांवाचे सांस्कृतीक केंद्र असल्याचे प्रतिपादन ग्रामपंचायत अधिकारी डी.एस.सरवदे म्हणाले तर स्वानंद सार्वजनिक वाचनालय गाव विकासाचे मुख्य केंद असल्याचे सांगून गावा बरोबरच राज्याला दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन सरपंच सौ. अंजना गायकवाड यांनी केले.
शिक्षणाचा मुळ उद्येश साध्य करण्याचे चौफेर कार्य स्वानंद सार्वजनिक वाचनालय करत असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापिका सौ. आचार्य व्ही.जी. सहशिक्षीका सौ.देशमुख एस.यु.सहशिक्षक कळके एन.एस.यांनी केले. यावेळी ग्रंथप्रदर्शन, ग्रंथवाचन,रंगभरण, कथाकथन,वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या.सर्व कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.
सर्व अंगनवाडी मुख्य सेविका,मदतनिस, विद्यार्थी,ग्रामस्थ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.ग्रंथवाचन आनंद भैय्या गायकवाड,संजय सोनवणे,प्रकाश गायकवाड,दिव्यासाबळे, रामराजे गायकवाड, नारायण भाऊ गायकवाड,बाळासाहेब गायकवाड यांनी केले.
कथाकथन स्पर्धेत भक्ती गायकवाड – प्रथम, वेदिका गायकवाड – द्वितीय,वेदिका गायकवाड -तृतीय यांनी प्राविण्य मिळविले. रंगभरण स्पर्धेत नम्रता गायकवाड -प्रथम,सुशांत सौदागर – द्वितीय,प्रतिक पानढवळे – तृतीय,वक्तृत्व सर्धत भक्ती गायकवाड – प्रथम,नम्रता गायकवाड द्वितीय,वेदिका गायकवाड – तृतीय यांनी प्राविण्य मिळविले. परिक्षक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक छगननाना गायकवाड यांनी काम पाहिले.
प्रमाणपत्र वितरण व बक्षीस वितरण ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष,जेष्ठ विचारवंत, जेष्ठ समाजसेवक, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते व परखड व्याख्याते प्राचार्य,डॉ.वसुदेव बप्पा गायकवाड व बाळासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सुनसंचलन व आभार प्रदर्शन आनंद भैय्या गायकवाड यांनी केले.



