न्यायालयीनसामाजिक

केज तालुक्यातील वीज टॉवर केबल चोरी प्रकरणी आरोपीस जामीन मंजूर.अॕड.दिनेश बिक्कड,अॕड.आशिष कुमार ठोंबरे यांनी मांडली न्यायालयात भक्कम बाजू 

केज/प्रतिनिधी

केज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरी व दरोड्याचा गुन्हा क्र. १६१/२०२६ प्रकरणात आरोपीस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी न्यायालयात आरोपीच्या वतीने अ‍ॅड. आशिषकुमार ठोंबरे व अ‍ॅड.दिनेश बिक्कड यांनी बाजू मांडली.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम ३१०,(४),(५)(६) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा १२२ कलमान्वये दाखल करण्यात आला होता. आरोपीने वीज टॉवरवर चढून केबल वायर चोरी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे टॉवर खाली कोसळले असा गंभीर आरोप आरोपीवर आहे. या घटनेमुळे टॉवरचे नुकसान झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.ही घटना दि. २९ मार्च २०२६ रोजी घडल्याचे समोर आले असून,आरोपी हा गाव परिसरात संशयास्पद हालचाली करत असताना पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला.

त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला.दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, तपासाचा बहुतांश भाग पूर्ण झाला असून आरोपीची पुढील कोठडी आवश्यक नाही.तसेच आरोपी पळून जाण्याची किंवा पुरावे नष्ट करण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी नमूद केले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस अटी व शर्तींसह जामीन मंजूर केला.पुढील तपासासाठी आवश्यक तेव्हा हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!