
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती पैकी २३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यांचा कार्यकाळ दि.१६ फेब्रुवारी रोजी पूर्ण झाल्यामुळे या २३ ग्रामपंचायतीवर १३ प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामूळे इच्छुकांना आता ग्रामपंचायतनिवडणुकीचे वेध लागले आहेत.त्यामूळे आता निवडणुका कधी होणार ? याकडे गाव पातळीवरील पुढाऱ्यांचे लक्ष लागले आहे.यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायती च्या सरपंचपदाची निवड ही सदस्यांतून करण्यात आली होती.त्यामुळे सरपंच आणि उपसरपंच हे दोन्ही एका गटाचे झाले होते.परंतु आता सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार असल्या मूळे अनेक गावचे पुढारी सरपंच होण्यासाठी गुढग्याला बाशिंग बांधून बसले आहेत.
प्रभाग रचनेच्या प्रक्रियेस या महिन्यात २७ तारखे पासून सुरुवात होणार असून ४मे पर्यंत प्रभाग रचनेची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.त्यामुळे निवडणूक प्रक्रियेसाठी आणखीकाही महिन्यांचा अवधी शिल्लक असल्याने इच्छुक उमेदवारांना तयारीसाठी भरपूर वेळ मिळणार आहे.सरपंच पदाचे आरक्षण अगोदरच सुटल्यामुळे व अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे महिलांसाठी आरक्षित राहिल्यामुळे सरपंच पदासाठी इच्छुक असलेल्याना पुन्हा संधी मिळणार नसल्याने त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
सरपंच पदाचे आरक्षण जाहीर.
ज्या २३ ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण झाला आहे.त्या ग्रामपंचायती च्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले असून,यात अनुसूचित जाती महिलासाठी मोटेगाव,लाखा, अनुसूचित जमाती धोतरा,इतर मागास वर्गीयांचा प्रवर्ग पैठण, दरडवाडी,काशीदवाडी, गप्पेवाडी,भोपला,शिंदी, इतर मागास वर्गीयांचा प्रवर्ग महिला: बोबडेवाडी,येवता, रामेश्वरवाडी,पाथरा, सर्वसाधारण : आंधळेवाडी,जाधव जवळा,घाटेवाडी, नारेवाडी,कोरडेवाडी. सर्वसाधारण महिला : मुंडेवाडी,विडा,सुकळी, बानेगाव,वाघेबाभूळगाव या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
या ग्रामपंचायतींचा कार्यकाल संपला.
२०२१ मध्ये निवडणुका झालेल्या केज तालुक्यातील बोबडेवाडी मुंडेवाडी,आंधळेवाडी, पैठण,विडा/गौरवाडी, येवता,धोतरा,दरडवाडी, जाधवजवळा, काशिदवाडी,सुकळी, बानेगाव,रामेश्वरवाडी, ढाकणवाडी,घाटेवाडी, गप्पेवाडी/नामेवाडी, वाघेबाभुळगाव,नारेवाडी, पाथरा,भोपला,मोटेगाव, लाखा,कोरडेवाडी,शिंदी या २३ग्रामपंचायतीचा कार्यकाल १६ फेब्रुवारी रोजी संपला आहे.
२३ ग्राम पंचायतीवर १३ प्रशासक.
मुदत संपलेल्या २३ ग्रामपंचायतीवर १३ प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून सून,यात कृषी अधिकारी भाऊसाहेब राठोड बोबडेवाडी,कृषी अधिकारी ए.ए.डाके मुंडेवाडी, आंधळेवाडी, विस्तारअधिकारी ए.व्ही. चौरे पैठण,विस्तार अधिकारी आर.एच. राठोड विडा/गौरवाडी, येवता,विस्तार अधिकारी व्ही.एम.मस्के धोतरा, दरडवाडी,बानेगाव,विस्तार अधिकारी व्ही.एल.कदम जाधव जवळा,काशिदवाडी, एस . एम.जहागीरदार सुकळी,एस.बी. करंजवणकर रामेश्वरवाडी ढाकणवाडी, बी.के.गायकवाड घाटेवाडी,गप्पेवाडी/ नामेवाडी, जे.एम. भूतपल्ले वाधे बाभुळगाव,नारेवाडी,शाखा अभियंता ए.एस. पटेल पाथरा,भोपला,शाखा अभियंता एस.डी. हातागळे मोटेगाव,लाखा,शाखा अभियंता एस.के. वीर कोरडेवाडी , शिंदी यांचा समावेश आहे.



