सामाजिक

टाकळी येथे उडणार बैलगाडा शर्यतीचा धुरळा! ‘रानोबा केसरी’चा थरार रंगणार ; आ.नमिताताई मुंदडा यांची विशेष उपस्थिती!

केज/प्रतिनिधी

ग्रामीण संस्कृतीचा कणा आणि शौर्याचे प्रतीक असलेली बैलगाडा शर्यत आता टाकळी (केज) नगरीत थरार निर्माण करण्यास सज्ज झाली आहे.ग्रामदैवत श्रीरानोबा यात्रेनिमित्त ‘पर्व ४ थे’ अंतर्गत भव्य ‘रानोबा केसरी’ ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि.२७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:३० वाजल्यापासून टाकळीच्या मैदानात हा ‘नाद’ घुमणार आहे.

बक्षिसांचा पाऊस: ४१ हजारांसह मानाची ढाल!

या स्पर्धेत विजेत्यांना एकूण सात क्रमांकापर्यंत भरघोस बक्षिसे दिली जाणार आहेत प्रथम क्रमांक ₹४१,००० व २ मानाच्या ढाली (सौजन्य: आ.नमिताताई अक्षय मुंदडा),द्वितीय क्रमांक ₹३१,००० व २ मानाच्या ढाली (सौजन्य: सुरज रामकृष्ण घुले),तृतीय क्रमांक ₹२१,००० व २ मानाच्या ढाली (सौजन्य: विष्णू जीवन राख),या व्यतिरिक्त ७ व्या क्रमांका पर्यंत रोख बक्षिसे व ढालींचे वितरण केले जाईल.

आपली परंपरा आणि खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी सर्व बैलगाडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

— सुरजभैया घुले युवा नेते,भाजपा.

केज तालुक्यात सध्या एकाच नावाची चर्चा आहे,ती म्हणजे टाकळी येथील ‘रानोबा केसरी’ बैलगाडा शर्यतीची.श्री रानोबा यात्रा कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ, टाकळी यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातील नामांकित बैलगाडे सहभागी होणार आहेत.

अखिल भारतीय बैलगाडा संघटना आणि शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून ही स्पर्धा पार पडणार आहे.स्पर्धे साठी ७९९ रुपये प्रवेश फी असून,बीड रोड पासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या टाकळी शिवरस्त्यावरील मैदानात ही स्पर्धा रंगणार आहे.या सोहळ्याला आमदार नमिताताई मुंदडा,युवा नेते सुरजभैया घुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!