बनसारोळा येथे महात्मा जोतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त शालेय साहित्य वाटप

केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील बनसारोळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत महात्मा जोतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त अरविंद महादेव गोरे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यां मध्ये शिक्षणाविषयी उत्साह निर्माण झाला आहे.कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा जोतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वही,पेन आदी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणा च्यामाध्यमातून समाजात केलेल्या परिवर्तनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनीही या महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारा पासून प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी,असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमास बजरंग बप्पा काकडे,नंदू कावळे, भुजंग गायकवाड,सुधीर रानमारे,अरविंद गोरे, राजाभाऊ धायगुडे,बापू कावळे,अनिल जोगदंड, मारुती नवघन यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद,ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.



