सामाजिक

केज येथे संघटन सृजन अभियान संपन्न

केज/प्रतिनिधी

अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये मागच्या काही दिवसांपासून संघटन सृजन अभियान सुरू आहे.गाव पातळी पर्यंत पोहोचलेले हे अभियान बीड जिल्ह्यातही सुरु असून शेवटच्या टप्प्यात आहे. आणि याचाच एक भाग म्हणून केज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने केज येथे संघटन सृजन अभियान आयोजित करण्यात आले होते.

केज येथे बुधवार दिनांक ९ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभियानासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या सरचिटणीस नीतू वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती.तर सदरील कार्यक्रमासाठी बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे, काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रकाश भन्साळी,बाळासाहेब ठोंबरे,कविताताई कराड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.सदरील कार्यक्रमादरम्यान राहुल सोनवणे यांनी प्रस्ताविक केले आणि यामध्ये त्यांनी संघटन सृजन अभियानाची सविस्तर माहिती दिली.

तसेच जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यभार हाती घेतल्या पासून बीड जिल्ह्यामध्ये जे जे विविध उपक्रम राबवल्या गेले त्याचीही माहिती सादर केली. यावेळी प्रकाश भन्साळी, कविताताई कराड, सिद्धेश्वर पाटील यांच्या सह सामाजिक क्षेत्रातील काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना राहुल सोनवणे यांच्या कार्यकाळात बीड जिल्हा काँग्रेसला नवचेतना मिळाली असल्याचे सांगितले.यावेळी कार्यक्रमानंतर नीतू वर्मा यांनी वैयक्तिक भेटीसाठी वेळ देऊन कार्यकर्ते व पत्रकारांशी संवादही साधला.तसेच बीड जिल्हा काँग्रेसचे काम समाधानकारक असून सर्वानुमते जिल्हाध्यक्ष निवडला जाणार असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान सदरील कार्यक्रमासाठी तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!